🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला तातडीने दिले 'हे' आदेश

 


सातारा | चांगभलं वृत्तसेवा

एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा कडक असल्याने जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घ्या, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या, ज्या ठिकाणी टँकरची मागणी येईल, त्या भागाला टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच जिल्ह्यातील धरणांमधील पाणी हे प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत मंत्री देसाई बोलत होते.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातला पारा वाढत असून एकीकडे प्रचंड उकाड्याने लोकं हैराण झाली आहेत. त्यातच तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी घटत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आढावा बैठक घेऊन प्रशासनाला पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्याने जिल्ह्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, यांच्यासह सर्व प्रांत व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या गावासाठी किंवा वाडी वस्त्यांसाठी टँकरची मागणी आल्यास तात्काळ संबंधित गावाला भेट देऊन टँकर सुरु करावा, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील पाण्याचे हात पंप बंद पडले आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. ज्या ठिकाणी विंधन विहिरीची गरज आहे अशा ठिकाणी नव्याने विंधन विहिरी घ्याव्यात तसेच दुरुस्तीचे कामे हाती घ्यावीत. टंचाई काळात शेतकऱ्यांचे देयकाअभावी विज कनेक्शन तोडू नये. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल या पद्धतीने पाणी साठवून ठेवावे.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्याने पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून कामे करावीत. ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे विहीर अधिग्रहीत करण्यासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. एकूणच पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या