🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा 'हायटेक' करण्यास प्रारंभ

 


डोंगरी भागातील गावाने पटकावला पहिला मान ; शाळेत सुरू झाला 'संगणक लॅब कक्ष'

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


कराड तालुका पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या पहिल्याच मासिक सभेत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना विविध सोयी-सुविधा पुरवून या शाळांना खाजगी शाळांसोबतच्या स्पर्धात्मक पातळीवरचा 'स्मार्ट' लुक देण्याचा ठराव झाला होता. पंचायत समितीमध्ये विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी ही मागणी उचलून धरताना या कामी आपले सभागृहाला पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली होती. याला साजेशा कामाची सुरुवात झाली असून डोंगरी विभागातील उंडाळेच्या जिल्हा परिषद शाळेत संगणक साहित्य लॅब कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे या कामात उंडाळेच्या जिल्हा परिषद शाळेने पहिला मान पटकावत या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

उंडाळे (तालुका कराड ) येथील या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून उपलब्ध करून दिलेल्या संगणक साहित्याच्या लॅब कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती सदस्य नितीन थोरात, सदस्या वृषाली पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नितीन जगताप, सरपंच संगीता माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले की, “मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हेच खरे शिक्षण असून ते विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येय निश्चितीकडे मार्गदर्शन करते. प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेतल्यामुळे कोणताही न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. अनेकांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन समाजात नावलौकिक मिळवला आहे.”

ते पुढे म्हणाले की, भाषा ही सरावावर अवलंबून असते. संगणक लॅबचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी मराठीसोबत इतर भाषांवरही प्रभुत्व मिळवावे. इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढत असला तरी जिल्हा परिषदांच्या मराठी शाळा देखील हायटेक होत असून शासन विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन त्यांनी केले.

विस्तार अधिकारी नितीन जगताप म्हणाले की, “मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी ग्रामस्थ व पालकांची आहे. ग्रामीण भागात पटसंख्या कमी झाल्यामुळे काही शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून शाळा सक्षम व परिपूर्ण बनत आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे.”

कार्यक्रमास केंद्रप्रमुख धनश्री जगताप, माजी विस्तार अधिकारी अरुण पाटील, मुख्याध्यापिका नंदा मोरे, ग्रामसेवक शरद चव्हाण, स्पेलिंग बी उपक्रमाचे प्रमुख बावा सर, चव्हाण मॅडम, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर पाटील, अजित पाटील तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सुहास पाटील सर यांनी मानले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #NCP #ZPSchoolKarad

#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

#उदयसिंहपाटीलउंडाळकर #नितीनथोरात #वृषालीपाटील

#जिल्हापरिषदशाळा #उंडाळे #कराडदक्षिण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या