🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सातारा जिल्ह्याला दुष्काळाचा विळखा! जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश

 खरीप हंगाम २०२६ साठी राज्य शासनाचा निर्णय; अन्य तालुक्यांसह कराड, पाटणला दिलासा


चांगभलं प्रतिनिधी | कराड


खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई, कोरेगाव आणि कराड या सर्व ११ तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश झाल्याने खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाकडून लागू करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि सवलतींकडे लागले आहे.
ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ च्या आधारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन
दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२६ मधील परिस्थितीच्या आधारे यापूर्वी ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या २६५ तालुक्यांना दुष्काळी तालुके म्हणून घोषित करण्यात आले होते.
त्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ट्रिगर-१ (प्रथम कळ) आणि ट्रिगर-२ (दुसरी कळ) लागू झालेल्या राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच ५ ऑक्टोबर २०२६ नंतर राज्यातील पावसाळा संपल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिमतः ३०५ तालुके दुष्काळी घोषित करून त्याठिकाणी विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी यादीत
शासन निर्णयातील यादीमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांचा समावेश होतो.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता शासनाकडून कोणत्या सवलती प्रत्यक्ष लागू होणार, त्यांचे स्वरूप काय असेल आणि पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कराड तालुका दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्यासह विविध पक्ष व संघटनानी प्रयत्न केले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करून शासनाचे लक्ष देखील वेधण्यात आले होते.

➖➖➖➖➖

#Karad #Satara #News #ChangbhalaNews



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या