हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला आहे. वाशी, नवी मुंबई येथे पार पडलेल्या 'बॉयलर इंडिया एक्स्पो २०२६' मध्ये कारखान्याला शुगर श्रेणीत 'बेस्ट बॉयलर युझर्स' मध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना नुकताच साखर उद्योगातील उल्लेखनीय व भरीव योगदानाबद्दल ‘डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन’च्या वतीने प्रतिष्ठेचा 'साखर उद्योग गौरव पुरस्कार' मिळाला आहे. त्यानंतर लगेचच 'बॉयलर इंडिया एक्स्पो २०२६' मध्ये कारखान्याला 'बेस्ट बॉयलर युझर्स' मध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. औद्योगिक सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर आणि उत्कृष्ट ऊर्जा व्यवस्थापन या निकषांवर कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याने यापूर्वी तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रात अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर उच्च तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन, सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि डिस्टिलरीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, राज्य व प्रादेशिक पातळीवर उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी नामांकित संस्थांचे प्रतिष्ठित पुरस्कार कारखान्याला प्राप्त झाले आहेत.
या सर्वोत्कृष्ट पुरस्कारांच्या उज्ज्वल परंपरेत 'बॉयलर इंडिया २०२६' मध्ये तृतीय क्रमांक मिळाल्याने कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, शेतकरी वर्ग, अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून अभिनंदन केले जात आहे.
➖➖➖➖➖
#कृष्णासाखरकारखाना #डाॅसुरेशभोसले #RethareBk

0 टिप्पण्या