🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

निसर्गोपचार तज्ञ पत्रकार संगीता थोरात यांना बुलढाणा येथे ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ प्रदान

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड

निसर्गोपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शामगाव येथील निसर्गोपचार तज्ञ पत्रकार संगीता थोरात यांना त्यांच्या कार्याची दखल घेत ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुलढाणा येथील भातृमंडळ हॉलमध्ये रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए तसेच योगा व निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गोपचार क्षेत्रात विविध माध्यमातून कार्य करणाऱ्या चिकित्सकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध भागांतून शेकडो निसर्गोपचार तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड, बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. पूजा गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, प्रा. डॉ. प्रशांत कपले (महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर) तसेच एमजीएम विद्यापीठाचे योग विभाग प्रमुख गंगाप्रसाद खरात उपस्थित होते.
यावेळी मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, तसेच सौ. दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत, अशोक देवकर, संजय गवारे, सौ. स्मिता खारकर, राहुल देशमुख, आशिष सूर्यवंशी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
निसर्गोपचार क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संगीता थोरात यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कराड परिसरासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे कराडच्या निसर्गोपचार क्षेत्राच्या कार्याचीही राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या