🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

'कृष्णा' कारखान्याकडून ५९ गावांत 'मोफत घरपोच साखर' वाटप पूर्ण

 दिवाळीपूर्वी सर्व सभासदांना लाभ मिळण्याचे नियोजन ; सभासदांची दिवाळी होणार गोड

बोरगाव : सभासदांना 'मोफत घरपोच साखर' वाटप प्रसंगी कारखान्याचे संचालक सत्यजीत पाटील, संजय पाटील, प्रमोद शिंदे, सूर्यकांत पाटील, उमेश पाटील, सचिन देसाई, विजय वाटेगावकर, विकास पाटील आदींसह सभासद, कार्यकर्ते.


हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सभासदांसाठी 'मोफत घरपोच साखर वाटप' उपक्रम वेगाने सुरू आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत ५९ गावांमध्ये हे वाटप पूर्ण झाले असून, आगामी दिवाळी सणापूर्वी उर्वरित सर्व गावांमध्ये वाटप पूर्ण करण्याचे नियोजन कारखाना प्रशासनाने केले आहे.

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या वतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्येक सभासदाला दिली जाणारी प्रति शेअर्स ६० किलो मोफत साखर थेट घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने हे अभिवचन तत्परतेने पूर्ण केले आहे. ऐन सणासुदीत दिवाळीपूर्वी मोफत साखर उपलब्ध झाल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या उपक्रमामुळे सर्व सभासदांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार असून, सभासदांप्रती असलेली कारखान्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

बोरगाव येथे शुक्रवारी सभासदांना 'मोफत घरपोच साखर' वाटप करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक सत्यजीत पाटील, संजय पाटील, प्रमोद शिंदे, सूर्यकांत पाटील, उमेश पाटील, शंकर पाटील, सुरेश पाटील, आशिष शिंदे, शकील मुल्ला, अमर पाटील, सचिन देसाई, सचिन पाटील, लालासो शिंदे, विजय वाटेगावकर, सुनील पाटील, रमेश पाटील, उदयसिंह पाटील, अधिक पाटील, माणिक लोंढे, वैभव मोरे, संग्राम पाटील, सुनील मिस्त्री, जयंत पाटील, तानाजी म्हस्के, विकास पाटील, तेजस पाटील, नाना बर्डे आदींसह कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरपोच साखर वाटपामुळे बोरगाव परिसरातील सभासदांनी समाधान व्यक्त करत कारखाना प्रशासन व चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे आभार मानले.

कारखान्याच्या वतीने आतापर्यंत कार्यक्षेत्रातील रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, रेठरे हरणाक्ष, बिचूद, देवराष्ट्रे, कमळापूर, रामापूर, काले, धोंडेवाडी, कामेरी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, वांगी, मोहिते वडगाव, कुंभारगाव, वाडगाव हवेली, कोरेगाव, तांबवे, धोत्रेवाडी, येवलेवाडी, हिंगणगाव खुर्द, तडसर, शेरे, गोंदी, पेठ, नायकलवाडी, वाघवाडी, जांभूळवाडी, भाळवणी, शेळखबाव, शिरगाव, दुशेरे, शेणोली, खरातवाडी, बहे, हुबालवाडी, चिंचणी, आसद, पाडळी, वाठार, मालखेड, नेर्ले, सोनखिरे, सोनसळ, शिरसगाव, आटके, नांदगाव, अंबक, बलवडी, बोरगाव, फार्णेवाडी, अपशिंगे, कोतवडे, खंबाळे, नेर्ली, आणे, कोळे, येडेमच्छिन्द्र, शिरटे या ५९ गावांत मोफत साखर वाटप पूर्ण झाले आहे.


➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या