🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडच्या सैनिक कक्षात माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या; तक्रार अर्जांवर कार्यवाहीसाठी पुढाकार

 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक गोरखनाथ जाधव यांचा मासिक दौरा; विविध विभागांशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न



चांगभलं प्रतिनिधी | कराड


 माजी सैनिक, सेवारत सैनिकांचे कुटुंबीय आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या विविध प्रशासकीय समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक गोरखनाथ जाधव यांनी बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी कराड तहसील कार्यालयातील सैनिक कक्षाला मासिक दौऱ्यानिमित्त भेट दिली. यावेळी नायब तहसीलदार बाबुराव राठोड उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. पेन्शन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग तसेच अन्य शासकीय विभागांशी संबंधित प्रश्नांबाबत लेखी तक्रार अर्ज स्वीकारण्यात आले. प्राप्त अर्ज पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या कल्याण संघटकांकडे सुपूर्द करण्यात आले. संबंधित विभागांशी समन्वय साधून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सैनिकांसाठी एक खिडकी योजना
सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम कराड तहसील कार्यालयात सैनिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदल तसेच निमलष्करी दलातील सेवारत सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना विविध शासकीय कार्यालयांशी संबंधित कामांसाठी मदत मिळावी, हा या कक्षाचा उद्देश आहे.
या सैनिक कक्षाच्या माध्यमातून एक खिडकी योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागांशी संबंधित प्रश्नांवर प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली कार्यवाही केली जाते. संबंधित विभागांशी समन्वय साधून सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सैनिक कक्षाची एक खिडकी योजना राबविण्यासाठी सैनिक फेडरेशन व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासकीय कामकाजात मदत मिळून त्यांना न्याय मिळावा, यासाठी संघटनेकडून पाठपुरावा केला जात आहे.
यावेळी सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, तालुकाध्यक्ष हणमंत शिरतोडे, उपाध्यक्ष हणमंत मडकई, उपाध्यक्ष संदीप पाटील, माजी सैनिक रमेश जाधव, श्याम कांबळे यांच्यासह अन्य माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖

#सैनिककल्याण #सैनिकफेडरेशन #प्रशांतकदम #चांगभलंन्यूजपेपर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या