🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

ऑपरेशन मुस्कानमुळे १५ हरविलेल्या व्यक्तींचा शोध; कराड शहर पोलिसांची यशस्वी कारवाई

 कराड शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाची कामगिरी; २ बालकांसह महिला व हरविलेल्या व्यक्तींना सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात




चांगभलं प्रतिनिधी | कराड

हरविलेल्या व्यक्ती, महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ विशेष शोध मोहिमेंतर्गत कराड शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने एकूण १५ हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. यामध्ये दोन बालकांचाही समावेश असून, कराड शहर पोलिसांच्या या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
दिनांक ३० सप्टेंबर २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी हरविलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क साधून आवश्यक माहिती संकलित केली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि नॅटग्रीड प्रणालीचा वापर करून शोधकार्याला गती देण्यात आली. या प्रयत्नांतून पाच हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. याशिवाय आठ महिला व व्यक्ती आणि दोन हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यात आला. अशा एकूण १५ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
शोध घेण्यात आलेल्या व्यक्ती, महिला आणि बालकांना घर सोडून जाण्यामागील कारणे तसेच ते कोणत्या परिस्थितीत घरातून निघून गेले, याबाबत चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे समुपदेशन करून त्यांना सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
हरविलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांचा जलद तपास
हरविलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये लागू असलेल्या कायदेशीर तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा नोंदवून तपास करण्याच्या प्रक्रियेचा अवलंब केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक जलद गतीने करण्यावर भर देण्यात येत आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार १५ दिवसांसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. उर्वरित हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे विशेष पथक प्रयत्नशील आहे.
विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय गोडसे, पोलीस हवालदार वसीम संदे, महिला पोलीस कर्मचारी सविता मोहिते, सुवर्णा कदम, पुनम सावंत, शितल आरोटे, प्रीती कांबळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी मयूर देशमुख आणि हर्षद साळुंखे यांनी सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

➖➖➖➖➖➖

#ऑपरेशनमुस्कान #कराडपोलीस #कराडशहरपोलीस #हरविलेल्याव्यक्तींचाशोध #हरविलेलीबालके #महिलासुरक्षा #सातारापोलीस #सातारा #कराड #महाराष्ट्रपोलीस #ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या