🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

हार्डवेअर साहित्य चोरीप्रकरणी चौघांना अटक

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

चचेगाव, ता. कराड गावच्या हद्दीतील इंजीनिअरिंग कंपनीच्या गोडाऊनमधून सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे हार्डवेअर साहित्य चोरी करणाऱ्या चौघांना कराड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

याबाबत सचिन विष्णू पवार (रा. चचेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात अविराज अनिल मोहिते (वय 21) रा. गणेश कॉलनी, आगाशिवनगर), यश उत्तम जवादे (वय 18) रा. त्रिमूर्ती कॉलनी, आगाशिवनगर), मयंक उर्फ वेदांत दत्तात्रय जाधव (वय 19) रा. शिवपर्वत कॉलनी, आगाशिवनगर) आणि लक्ष्मण राममिलन प्रजापती (वय 56) रा. श्रीराम पार्क, थोरात हॉस्पिटलशेजारी कार्वेनाका) या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चचेगाव येथील सचिन पवार यांची गावातच पवार इंजीनिअरिंग नावाची कंपनी आहे. याठिकाणी हार्डवेअर साहित्य उत्पादित केले जाते. संबंधित साहित्य बंदिस्त गोडाऊनमध्ये ठेवले जाते. काही दिवसांपूर्वी या साहित्यापैकी 67 हजार 250 रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचे सचिन पवार यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मालाच्या साठ्याची तीन महिन्यांची स्टेटमेंट काढून खात्री केली असता एकूण 4 लाख 90 हजार रुपये किंमतीचे हार्डवेअर साहित्य चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांकडून चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून 3 लाख 16 हजार 500 रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या