🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सहकार पॅनेलच्या विजयासाठी रयत संघटना सर्व शक्तीने मैदानात; रयतच्या 'केडरबेस' कार्यकर्त्यांमुळे सहकार पॅनेलचा विजय सुकर होईल - ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर

 


हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी आमच्यामधील पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो असून य. मो. कृष्णा साखर कारखान्याच्या या निवडणुकीत सहकार पॅनलच्या विजयासाठी रयत संघटना सर्व शक्तीने मैदानात उतरली आहे. त्यामुळे रयत संघटनेचे कार्यकर्ते आपली 'केडरबेस' यंत्रणा सक्षम करून सहकार पॅनेलला विजय मिळवून देतील, अशी ग्वाही संघटनेचे नेते ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी दिली.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारार्थ कार्वे (ता. कराड) येथे आयोजित रयत संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सहकार पॅनलचे उमेदवार बी. एन. थोरात, रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, डॉ. सुधीर जगताप, सुजीत थोरात, रंगराव थोरात, प्रतापराव कणसे, प्रदीप पाटील, शिवाजीराव जाधव, अधिकराव गरुड, के. टी. पाटील, मोहनराव थोरात, माणिकराव पाटील, पैलवान आनंदराव मोहिते, राजू मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, ‘रयत’ आणि ‘कृष्णा’ समुह जवळपास ३५ वर्षे सहकारात काम करत आहेत. सहकारी संस्था सक्षम करण्यासाठी काका आणि आप्पांनी जो मार्ग आखून दिला, त्यावर चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकवेळी विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा समाजाच्या हिताचे काय आहे ते पाहिले पाहिजे. सहकार टिकला तरच शेतीला आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळणार आहे, कारण सहकारी संस्थांच्या अर्थकारणावर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून असते. त्यामुळे सहकार टिकवणे काळाची गरज असून आज कार्पोरेट क्षेत्राशी सहकारी संस्थांना स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे चांगल्या चाललेल्या संस्थांना आणि त्या चांगल्या चालवणाऱ्या लोकांना पाठबळ देणे, म्हणजे सहकार वाचवण्यासारखेच आहे. त्यामुळे रयत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत जागरूकतेने काम करुन, सहकार पॅनलच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.


डॉ. सुरेश भोसले म्हणाले, भोसले – मोहिते हे २०१० साली एकत्र आले, तेंव्हा केवळ विलासराव पाटील (काका) यांच्यामुळे कारखान्याच्या सत्तेत काही लोक आले. मात्र, त्यानंतर एखाद्या सहकारी संस्थेत होवू नयेत, असे बदल झाले. कोणाच्यातरी सल्ल्याने हा कारखाना चालवला जात होता. विरोधकांच्या काळात महाराष्ट्राच्या कारखानादारीतील सर्वात मोठा ६० कोटींचा घोटाळा कृष्णा कारखान्यात झाला. एक दोन नव्हे तर ७७८ लोकांच्या नावावर खोट्या सह्या घेऊन हा घोटाळा झाला अन् कृष्णा कारखान्याच्या चेअरमनला जेलमध्ये जावे लागते, यामुळे कारखान्याची बदनामी झाली, काळ डाग लागला. त्यांच्या काळात १४०० कामगारांना कारखाना महिन्याला ५० लाख रूपये देत होता, मात्र या कामगारांचे रेकॉर्ड कुठे आहे ते आजपर्यंत सापडलेलेच नाही. कारखान्यात तेंव्हा सत्तांतर होऊन सहकार पॅनेलची सत्ता आली. पण त्यावेळी कारखाना चालवायला पैसे नव्हते. शेवटी उधारीवर कारखाना चालवला.

उंडाळकर – भोसले पॅटर्न लोकांनी मान्य केलेला पॅटर्न आहे. सहकारात संस्था या संघर्षातून नव्हे तर सहकार्याने पुढे चालल्या आहेत. एक निवडणूक सोडली तर उंडाळकर आणि भोसले गट एकत्रच राहिले आहेत.
आप्पा आणि काकांनी सहकाराचा विचार अंगीकारत एकत्र काम केले, त्यामुळेच या भागात मोठे पथदर्शी काम झाले. त्यातून आपल्या भागाची प्रगती झाली. आता तीच जबाबदारी आम्ही घेतली आहे. सहकारात चांगल्या चालणाऱ्या संस्था टिकविण्यासाठी संघर्ष थांबवून एकत्र आलो आहोत. भविष्यात आमचेही तुम्हाला भक्कम सहकार्य राहील, याची मी खात्री देतो.
आम्ही जे बोलतो ते करतो. दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत. याउलट विरोधक काहीही भूलथापा मारत आहेत , त्यांना बळी न पडता सभासद मतदारांनी सहकार पॅनेलला विजयी करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

प्रा. धनाजी काटकर यांनी सहकार पॅनल १५ हजारांपेक्षा मताधिक्याने निवडून येईल, मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.

डॉ. सुधीर जगताप म्हणाले, कृष्णा आणि कोयना ब्रँड एकत्र आले आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्यावेळी संकट येते तेंव्हा कृष्णा कारखाना डॉ. सुरेशबाबांच्या हातात सुरक्षित राहिला आहे. त्यांनी कामगारांना योग्य न्याय देण्याचे धोरण जपले आहे. त्यामुळे कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे.

यावेळी सुजीत थोरात, रंगराव थोरात व प्रतापराव कणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. अशोकराव थोरात यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला रयत संघटनेच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कृष्णाकारखानानिवडणूक #कृष्णाकारखाना #सहकारपॅनेल

#सुरेशभोसले #कार्वेसभा #रयतसंघटना #उदयसिंहपाटीलउंडाळकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या