🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडला वाहतूकीच्या कोंडीतून मुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल; सहापदरी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड
पुणे–बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहरातील वाहतूक कोंडीची दीर्घकालीन समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सहापदरी उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रविवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना आवश्यक मार्गदर्शन केले.
कराड शहर ते नांदलापूर या परिसरात उभारला जात असलेला ३.४७ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल पुणे–बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या विकासकामांपैकी एक मानला जात आहे. शेंद्रे ते नेर्ले या २,२२० कोटी रुपयांच्या महामार्ग विकास योजनेचा हा अविभाज्य भाग असून, उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.


सध्या या प्रकल्पाची कामे वेगाने सुरू असून, आगामी पावसाळ्यापूर्वी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पाहणीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षाविषयक उपाययोजना तसेच उर्वरित कामांचा आढावा घेतला. काम पूर्ण करताना कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये आणि आवश्यक तांत्रिक बाबी वेळेत पूर्ण कराव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
माध्यमांशी बोलताना खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, कराड शहरासह परिसरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर सहापदरी उड्डाणपूल शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होण्यास मदत होईल. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या पुणे–बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रकल्प राबवत आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीतील अडथळे दूर होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाहणी दौऱ्यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, सुनील काटकर, काका धुमाळ, नयन निकम, चिन्मय कुलकर्णी, अॅड. विनित पाटील, अभिजित गावडे यांच्यासह डी. पी. जैन कंपनीचे प्रकल्प अधिकारी दीपक कन्होजे, सोमेश यादव, जितेश भोयर तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अजित घारे उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#चांगभलंन्यूज #चांगभलं #साप्ताहिकचांगभलं


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या