🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

हैबत आडके यांच्यासह सात मान्यवरांना मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ; उद्या कराडला पुरस्कार वितरण सोहळा

 


प्रा. सुकुमार कांबळे, भीमाशंकर माहूर, दंगलकार नितीन चंदनशिवे, पै. अमोल साठे, शिरीष जंगम, प्रा. दीपक तडाखे यांचाही राज्यस्तरीय पुरस्कारांनी होणार सन्मान

चांगभलं प्रतिनिधी | कराड

सामाजिक, पत्रकारिता, साहित्य, कला, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात मान्यवरांचा मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्या वतीने विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये ‘चांगभलं’चे संपादक हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला असून, प्रतिष्ठानतर्फे आणखी सहा मान्यवरांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता हॉटेल सत्यजित विट्स, पुणे-बेंगळुरू महामार्ग, वारुंजी फाटा, ता. कराड, जि. सातारा येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांसाठी निवड झालेल्या मान्यवरांमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (डीपीआय)चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांना ‘मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध कवी, लेखक व व्याख्याते , दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त निरीक्षक शिरीष बाबुराव जंगम यांना प्रशासकीय सेवा आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल ‘महात्मा फुले राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
निवेदक, पत्रकारिता तसेच सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रात कार्यरत प्रा. दीपक सर्जेराव तडाखे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
गवंडी कामगार ते आदर्श उद्योजक असा प्रेरणादायी प्रवास करणारे मलकापूरचे नगरसेवक भीमाशंकर इराप्पा माहूर यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
एनआयएस राष्ट्रीय कोच, कुस्ती संघटक व कुस्ती प्रशिक्षक प्रा. पै. अमोल हरिबा साठे यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
तर पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘चांगभलं’चे संपादक हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराच्या मानपत्रात हैबतराव आडके यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नांदगावच्या मातीत जन्म, बेलवडे बुद्रुकच्या संस्कारांत झालेली जडणघडण आणि पत्रकारितेच्या माध्यमातून व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार म्हणून त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.
गेल्या २९ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या हैबतराव आडके यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, वंचित व उपेक्षित घटक, सामाजिक विषय आणि स्थानिक समस्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने वाचा फोडली आहे. विविध स्थानिक ते राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये त्यांनी बातमीदार म्हणून काम केले असून, त्यांच्या अनेक वृत्तमालिका व न्यूज स्टोरीज नामांकित दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. यापूर्वीही त्यांना जिल्हा व राज्यस्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, महात्मा ज्योतिबा फुले आदर्श पत्रकार पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला आहे.
‘परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द कायम असेल, तर कोणतीही लढाई जिंकता येते’ या विचारावर विश्वास ठेवत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे.


उद्या पुरस्कार वितरण सोहळा....
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतीमित्र मा. श्री. अशोकराव थोरात, मलकापूर राहणार आहेत.
यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे ओबीसी विभागाचे नेते भानुदास माळी, डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, महात्मा फुले जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. संभाजीराव मोहिते, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, कामगार नेते व उद्योजक महेंद्र घरात, दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक आघाडीचे अध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील- चिखलीकर तसेच सातारा जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुषमा राजेघोरपडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय तडाके हे या समारंभाचे स्वागताध्यक्ष आहेत.
सामाजिक, पत्रकारिता, साहित्य, कला, उद्योग आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात मान्यवरांचा एकाच व्यासपीठावर होणारा हा गौरव सोहळा असल्याने कराडसह सातारा जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांचे या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे लक्ष लागले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास मित्रपरिवार, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.


➖➖➖➖➖➖

#पुरस्कार #मुक्ताप्रतिष्ठान #कराडन्यूज #चांगभलंन्यूज

#राज्यस्तरीयपुरस्कार #हैबतआडके #सुकुमारकांबळे #दंगलकारनितीनचंदनशिवे #अमोलसाठे #भीमाशंकरमाहूर #शिरीषजंगम #दीपकतडाखे #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या