चांगभलं प्रतिनिधी | कराड
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून कराडमध्ये हॉकी लीजंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती यांच्यावतीने महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन या ठिकाणी पार पडला.
कराडचे सुपुत्र संजयजी शेटे यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (MOA ) चे महासचिव म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील कुस्तीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्तिमान मिळवून देणारे महाराष्ट्र च्या तांत्रिक कुस्तीचे आयडॉल आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच एमआयटी चे क्रीडा विभाग प्रमुख, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा विलास कथुरे यांना जीवनगौरव पुरस्कार,
हिंदुस्तानाचे पाचवे हिंदकेसरी आणि महाराष्ट्राचे पाचवे महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह आण्णा यांना सहकार महर्षी लोकनेते बाबुरावजी शेटे साहेब स्मृती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच महाराष्ट्राच्या कुस्तीचा स्टार पैलवान डबल महाराष्ट्र केसरी आणि पुणे महानगरपालिकेचा क्रीडा अधिकारी पैलवान शिवराज राक्षे याला महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कै. विश्वंभर कदम स्मृती आदर्श माता पिता पुरस्कार आंतरराष्ट्रीय धावपट्टू सुदेशना शिवणकर हिचे आई वडील हणमंत शिवणकर आणि सौ. प्रतिभा शिवणकर यांना तसेच
प्रा. संजय दुधाने यांना साहित्यरत्न, ज्येष्ठ कुस्ती निवेदक बाबाजी लीमन यांना मल्लयुद्ध कुस्ती स्वररत्न, बाळासाहेब तरस समाजरत्न, विकास पाटील काले यांना शिक्षण रत्न, वस्ताद ताराचंद कलापुरे यांना कुस्ती भूषण, ग्रामविकास अधिकारी संतोष साठे यांना समाजरत्न तसेच एकूण 50 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिंदकेसरी संतोष वेताळ यांची ice hocky राष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातून आलेल्या 50 खेळाडूंना तसेच विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष हरीश बापू कदम, कराड समिती सदस्य जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. धनंजय पाटील आटकेकर, पंचायत समिती उपसभापती सौ. अनिताताई सतीश वेताळ, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त वस्ताद नजरुद्दीन नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार नियोजन समिती सदस्य प्राध्यापक नितीन शिंदे तसेच पुरस्कार समितीचे स्वागताध्यक्ष वस्ताद प्रल्हाद जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या पुरस्कार सोहळ्याचे हे दहावे वर्ष असून खेळाडूंना प्रोत्साहन देणे तसेच नवोदित खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणारर आहोत, हाच या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मत पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आशियाई सुवर्णपदक विजेते प्रा. पै. अमोल साठे यांनी मत व्यक्त केले.
➖➖➖➖➖



0 टिप्पण्या