🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

अर्चनाताईंना चेअरमन करून इतिहास घडवा; पवारसाहेबांचा तसा निरोप घेऊन आलोय — शशिकांत शिंदे

 


कृष्णाच्या निवडणुकीत विंग येथून संस्थापक पॅनलच्या प्रचाराचा दमदार शुभारंभ

सत्ताधाऱ्यांनी एफआरपीपेक्षा एक तरी रुपया जादा दिला का? - अविनाश मोहितेंचा सवाल

मी दिलेला शब्द पाळणाऱ्या घराची सून, जे बोलणार ते करणारच - सौ‌. अर्चनाताई मोहिते

हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी, कराड

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व नेते विरोधकांना जावून मिळतात, तेंव्हा समजून जायचे की आपला नेता अविनाशदादा सर्वांनाच भारी ठरतोय. अशा कर्तॄत्वसंपन्न नेतृत्वाच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई मोहिते खंबीरपणे उभा राहिल्या असून उभ्या राहिल्या असून त्यांच्या संस्थापक पॅनेलला या निवडणुकीत साथ देण्याचे काम कृष्णा कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी करावयाचे आहे. तसा आदरणीय शरद पवारसाहेबांचा निरोपच घेऊन आज मी विंग येथील या प्रचार शुभारंभ सभेला आलो आहे. त्यामुळे लक्षात ठेवा अर्चनाताई मोहिते यांना चेअरमन करून आपल्याला इतिहास घडवायचा आहे. कृष्णाच्या सभासदांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून मला खात्री आहे की, येत्या निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करून त्या निश्चितपणे कारखान्यात नवा इतिहास निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.

 



विंग, ता. कराड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आयोजित कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलच्या भव्य प्रचार शुभारंभ सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन तथा संस्थापक पॅनलचे नेते अविनाशदादा मोहिते, पॅनलच्या नेत्या आणि उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते, सर्व उमेदवार प्रमुख उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले, इतिहास साक्षी आहे की, कृष्णा कारखान्याचे सभासद जी सर्वांना अशक्य गोष्ट वाटते तीच शक्य करून दाखवतात आणि इतिहास घडवतात. कारखान्यात विरोधकांनी खोट्या केसेस टाकल्या, तरीही अविनाशदादा खंबीरपणे लढत राहिले आहेत. आज संस्थापकांनी उभा केलेला हा कारखाना डबघाईला आला असून, सभासद शेतकऱ्यांसाठी तो पुन्हा सक्षमपणे उभा करणे, हीच त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे सभासदांना माझी विनंती आहे की या निवडणुकीत कोणत्याही प्रलोभनांना, आमिषांना भुलू नका. संस्थापक पॅनलने दिलेली सर्व आश्वासने निश्चितपणे पूर्ण होतील. सातारा आणि सांगली जिल्ह्याची महाराष्ट्रात क्रांतिकारकांचे जिल्हे, क्रांतीची भूमी म्हणून वेगळी ओळख आहे. हीच ओळख जपत दोन्ही जिल्ह्यांतील कारखान्याचे स्वाभिमानी शेतकरी सभासद नक्की इतिहास घडवून संस्थापक पॅनलला मोठ्या मताधिक्यांनी निवडून देतील, असेही ते म्हणाले.


यावेळी बोलताना अविनाशदादा मोहिते यांनी, कारखान्यातील सत्ताधाऱ्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या कारभारावर टीका करत एफआरपीपेक्षा त्यांनी अतिरिक्त १ रुपया तरी जास्त दर दिला का?  मग त्यांच्या कर्तुत्व काय? असा थेट सवाल केला. संस्थापक पॅनलच्या कार्यकाळात आदर्श चाललेल्या इरिगेशन योजना त्यांनी डबघाईला आणल्या. संस्थापक पॅनेल सत्तेत असताना सभासदांच्या ऊसाला एफआरपी पेक्षा जादा दर, वाढीव पाणी फेऱ्या, हजारो सभासदांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कामगारांना २५ टक्के बोनस देण्याचे काम केले. मात्र विरोधक सत्तेत आल्यानंतर आम्हाला कटकारस्थाने करून त्यांनी अडचणीत आणले. मात्र, आम्ही कुणाचा एकही रुपया घेतलेला नाही, हे सभासदांना चांगलेच माहित आहे. फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सत्ताधाऱ्यांची ही धडपड सुरू आहे. गोरगरिबांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या संस्था त्यांनी आजवर लुटल्या आहेत. आता कारखाना खाजगी व्हायची वाट आपण बघायची का? असा सवाल उपस्थित करून कारखाना सहकारी, सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, तो खाजगीकरणापासून वाचला पाहिजे, यासाठी हा लढा सुरू असल्याचे अविनाशदादा मोहिते यांनी सांगितले.

 



उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते म्हणाल्या, आज सगळे विरोधक एकवटले आहेत, पण आम्हाला पदावर असलेल्या कोणा नेत्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे, तुम्हा सभासदांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही संस्थापक पॅनेलच्यावतीने कारखान्याच्या सभासदांना १२० किलो विनामूल्य साखर देण्याचे, पाणीपट्टी आकारणीत बंद करून एकरी ७,५०० रुपये प्रमाणे पाणीपट्टी करण्याचे आश्वासन दिले आहे. ते तुमच्या साथीने पूर्ण करणार आहे, कारण मी सुद्धा एका शेतकऱ्याची लेक आहे. कारखान्याची सभासद आहे. मला तुमच्या कष्टाची जाणीव आहे. मी आदर्श शेती करणाऱ्या नूतन मोहिते यांची सून आहे, अविनाश मोहिते यांची पत्नी आहे, आणि दिलेला शब्द पाळणाऱ्या घराची सून आहे , त्यामुळे तुम्ही संस्थापक पॅनेलला निवडून दिले तर काळजी करू नका दिलेली सर्व आश्वासने मी शंभर टक्के पूर्ण करून दाखवणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मनोगतात नामदेव पाटील यांनी, कारखान्याच्या सभासदांच्या निधीतून उभा राहिलेला चॅरिटेबल ट्रस्ट विरोधकांनी बळकावल्याचा आरोप केला. बंडानाना जगताप यांनी, कारखान्याच्या ऊसदराचा मुद्दा प्रकर्षाने मांडत, कारखान्याला साखर व उपपदार्थांच्या उत्पादनातून चांगले पैसे मिळतात, त्यामुळे सभासदांना ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर देणे शक्य असल्याचे सांगितले.

यावेळी माजी संचालक सुभाष पाटील, उमेदवार महेश पाटील, उदय शिंदे, अविनाश पाटील-वाठारकर, रामभाऊ होगले, रवी काकडे, ॲड. प्रमोद पाटील, शेतकरी संघटनेचे विजय पाटील, आप्पा थोरात, गजानन पाटील आदींनीही मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमात घारेवाडी-पोतले परिसरातील बंधारा मंजूर आणि पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचा सत्कार केला. सभेस परिसरातील कारखान्याचे सभासद शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 "प्रचार वैयक्तिक पातळीवर नेऊ नका... अन्यथा " अविनाशदादांचा नामोल्लेख टाळून 'अतुलबाबांना' सल्ला....

दुबार व बोगस मतदार वाढवून आमदार झालेले महाशय हे कारखान्याच्या सभासदांना काय न्याय देणार? असा नाव न घेता डॉ . अतुल भोसले यांना टोला लगावत अविनाशदादा मोहिते यांनी 'या निवडणुकीतील प्रचार त्यांनी वैयक्तिक पातळीवर नेऊ नये अन्यथा आम्हालाही बोलावे लागेल, आणि आम्ही बोललो तर त्यांची पळता भुई थोडी होईल, असा इशारावजा सल्ला दिला.


धावरवाडीचा कारखाना कोणाच्या पैशांतून ?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या नैसर्गिक शैलीत फटकेबाजी केली. विरोधकांनी "धावरवाडीचा साखर कारखाना कुणाच्या पैशांतून काढला? शिरवळ प्रकल्पासाठी निधी आणला कुठून ? मग मदनदादांना स्वतःचा कारखाना का काढता आला नाही? असे रोखठोक सवाल केले. कृष्णा कारखान्याचे सभासद आपली झालेली फसवणूक विसरणार नाहीत, असे स्पष्ट करून, संस्थापक पॅनेलला मिळत असलेला पाठिंबा पाहता अर्चनाताई मोहिते कृष्णा कारखान्याच्या चेअरमन नक्कीच होतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

🔸भाषणातील ठळक मुद्दे..🔸
🟥 शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)
▪️ सर्व विरोधक एकत्र येत असल्याने अविनाशदादा मोहिते यांच्या नेतृत्वाची ताकद सिद्ध होते.
▪️ अर्चनाताई मोहिते यांना चेअरमन करून सभासदांनी इतिहास घडवावा.
▪️ खोट्या केसेस टाकूनही अविनाशदादा खंबीरपणे लढत आहेत.
▪️ संस्थापकांनी उभा केलेला कारखाना पुन्हा सक्षम करण्यासाठी संस्थापक पॅनलला साथ द्या.
▪️ प्रलोभने व आमिषांना बळी पडू नका; दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील.
▪️ सातारा-सांगलीतील स्वाभिमानी सभासद संस्थापक पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील.
🟥 अविनाशदादा मोहिते (नेते, संस्थापक पॅनेल)
▪️ गेल्या दहा वर्षांत सत्ताधाऱ्यांनी एफआरपीपेक्षा अतिरिक्त दर दिला नाही.
▪️ संस्थापक पॅनलच्या काळातील आदर्श इरिगेशन योजना डबघाईला आणल्या.
▪️ आमच्या कार्यकाळात जादा ऊसदर, पाणी फेऱ्यांत वाढ, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व २५% बोनस दिला.
▪️ कटकारस्थाने करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला.
▪️ कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, यासाठी हा लढा आहे.
▪️ गोरगरिबांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या संस्थांची लूट झाल्याचा आरोप.
🟥 अर्चनाताई मोहिते (उमेदवार, संस्थापक पॅनेल)
▪️ पदापेक्षा माणूस महत्त्वाचा, सभासदांचा विश्वास जपणार.
▪️ सभासदांना १२० किलो विनामूल्य साखर देण्याचे आश्वासन.
▪️ पाणीपट्टी एकरी ७,५०० रूपये करण्याचा निर्धार.
▪️ मी शेतकऱ्याची लेक असून सभासदांना न्याय देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन.
▪️ दिलेला शब्द पाळणाऱ्या घरची सून म्हणून सर्व आश्वासने शंभर टक्के पूर्ण करेन.
▪️ सभासदांच्या हितासाठी संघर्ष करून इतिहास घडवण्याचा विश्वास.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कृष्णासाखरकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णाकारखाना

#संस्थापकपॅनेल #अविनाशमोहिते #अर्चनाताईमोहिते

#कराड #वाळवा #ईश्वरपूर #सातारा #सांगली #निवडणूक 

#चांगभलंन्यूज #चांगभलं #चांगभलंवृत्तसेवा 

#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #विंगसभा

#संस्थापकपॅनेलप्रचारसभाविंग #विंगचामारुती #ऊसदर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या