🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील झोलंबी सफारी मार्गावर ‘तारा’ वाघिणीचे मनमोहक दर्शन

 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली जंगल सफारी मार्गावर दिसणारी ‘तारा’ वाघीण, झोलंबी परिसरात शांतपणे वावरताना घेतलेला क्षण.

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली जंगल परिसरात पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. २० जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास झोलंबी जंगल सफारी मार्गावर ‘तारा’ या वाघिणीचे अद्भुत दर्शन घडले.

सफारीदरम्यान अचानक समोर आलेली तारा वाघीण आपल्या राजस हालचालींनी आणि आत्मविश्वासपूर्ण वावराने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होती. जंगलातील विविध प्रदेशांच्या खुणा न्याहाळत, शांतपणे चालणारी तारा तब्बल दहा मिनिटांहून अधिक काळ पर्यटकांच्या नजरेसमोर होती. तिची देखणी देहयष्टी, सावध नजर आणि सहज वावर पाहून पर्यटक मंत्रमुग्ध झाले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचे हे जिवंत उदाहरण असून, अशा दुर्मीळ आणि रोमांचक वन्यजीव दर्शनामुळे जंगल सफारीचा अनुभव अधिक समृद्ध होत असल्याचे पर्यटकांनी सांगितले.

निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी चांदोली – सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा अनुभव घेण्यासारखा ठरत असून, अशा अद्भुत सफारी अनुभवांसाठी पर्यटकांनी या परिसराला अवश्य भेट द्यावी.

(वाघीण तारा - छायाचित्र - अमित माने)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#तारावाघीण #झोलंबीसफारी
#चांदोलीजंगल #सह्याद्रीव्याघ्रप्रकल्प
#वन्यजीवदर्शन #TigerSafari
#WildlifeNews #ForestSafari
#NatureLovers #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या