'सरकारी नोकरी'च्या आमिषाने ९ लाखांची फसवणूक; संशयित कराड तालुका पोलिसांच्या जाळ्यात
हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट पोस्टिंग ऑर्डर आणि शासकीय कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करून मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात आरोपीने एकापेक्षा अधिक व्यक्तींना अशाच पद्धतीने गंडा घातल्याचे समोर आल्याने या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात दि. 3 जुलै 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, आरोपीने स्वतःला वन्यजीवन अपराध नियंत्रण ब्युरो (Wildlife Crime Control Bureau) येथे नोकरीस असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादी तसेच इतर व्यक्तींना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी लाखो रुपये स्वीकारले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने शासकीय संस्थेचे बनावट शिक्के, संबंधित अधिकाऱ्यांची बनावट नावे व सह्या वापरून खोट्या पोस्टिंग ऑर्डर आणि अन्य बनावट कागदपत्रांची निर्मिती केली. या माध्यमातून फिर्यादीसह इतरांची तब्बल ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील आणि कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाची जबाबदारी देत आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार कराड तालुका पोलीस ठाण्याच्या डी.बी. (गुन्हे प्रकटीकरण) पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत जीवन तानाजी पवार (वय 29 वर्षे), रा. उत्तर कोपर्डे, ता. कराड, जि. सातारा या संशयिताला अटक केली.
प्राथमिक चौकशीत त्याने एकापेक्षा अधिक व्यक्तींना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील करीत आहेत.
दरम्यान, या आरोपीने यापूर्वीही अथवा इतर कोणाची अशाच प्रकारे फसवणूक केली असल्यास संबंधित नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ कराड तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार कोल्हाळ यांनी केले आहे. तसेच शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारची फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. फौ. नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, पोलीस नाईक किरण बामणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे, विजय यादव आणि सुरज चिंचकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
कराड तालुका पोलीस, Karad Taluka Police, कराड क्राईम न्यूज, Karad Crime News, कराड ब्रेकिंग न्यूज, सरकारी नोकरी फसवणूक, Job Fraud Maharashtra, Government Job Scam, बनावट पोस्टिंग ऑर्डर, Fake Posting Order, बनावट शासकीय कागदपत्रे, Wildlife Crime Control Bureau Fraud, WCCB Fraud, कराड फसवणूक प्रकरण, 9 लाखांची फसवणूक, आर्थिक फसवणूक, Fraud Case Karad, Maharashtra Crime News, सातारा क्राईम न्यूज, Satara Crime News, जीवन तानाजी पवार, निखिल पिंगळे, डॉ. वैशाली कडुकर, राजश्री पाटील, शितलकुमार कोल्हाळ, साक्षात्कार पाटील, कराड गुन्हे प्रकटीकरण शाखा, DB Squad Karad, Fake Government Job Scam, Marathi Crime News, Changbhala News, चांगभलं न्यूज, Karad Latest News, Satara Latest News, Maharashtra Police, Job Scam Arrest, Breaking Crime News
#ChangbhalaNews #Karad #KaradCrime #KaradPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #Satara #SataraCrime #GovernmentJobScam #JobFraud #FakePostingOrder #FraudCase #FinancialFraud #MaharashtraPolice #PoliceAction #CrimeBranch #KaradBreaking #LatestNews #MarathiBreakingNews #ScamAlert #FakeDocuments #JobScam #Maharashtra #CrimeUpdate #SataraNews #KaradNews #MarathiJournalism #TrendingNews #Changbhala

0 टिप्पण्या