🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडमध्ये शस्त्रांचा काळाबाजार रोखला!

 गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई; ४ देशी पिस्टल, ८ जिवंत काडतुसे जप्त, चौघे जेरबंद


हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

कराड शहरात देशी बनावटीची अग्नीशस्त्रे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणणाऱ्या चौघा संशयितांना कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत ४ देशी बनावटीची पिस्तुले (अग्नीशस्त्रे), ८ जिवंत काडतुसे आणि एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे कराड शहरात बेकायदा शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांनी नुकतेच बेकायदा अग्नीशस्त्रे बाळगणारे तसेच त्यांची विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दि. १० जुलै २०२६ रोजी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस हवालदार संदीप कुंभार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. मौजे कराड येथील शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागील ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत चार इसम देशी बनावटीची पिस्टले आणि जिवंत काडतुसे विक्रीच्या उद्देशाने थांबले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ कारवाईची सूत्रे हाती घेतली.
पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी शिताफीने छापा टाकून खालील चार संशयितांना ताब्यात घेतले.
१) अफताब बादशाह मोमीन (वय २४), रा. अकबर किराणा स्टोअर्सजवळ, मुजावर कॉलनी, कराड, जि. सातारा.
२) रेहान मेहबूब शेख (वय १९), rा. एपीजे अब्दुल कलाम चौक, मुजावर कॉलनी, कराड, जि. सातारा.
३) अमर रघुनाथ पाटील (वय २३), रा. मु.पो. काले (डाळींबाची बाग, देसाई मळा), ता. कराड, जि. सातारा.
४) ओंकार प्रकाश हिंगणे (वय २५), रा. मु.पो. येडेमच्छींद्र (चावडी चौक), ता. वाळवा, जि. सांगली.
झडतीदरम्यान संशयितांच्या ताब्यातून ४ देशी बनावटीची पिस्टले (अग्नीशस्त्रे), ८ जिवंत काडतुसे असा एकूण ३,५८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या शस्त्रांचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि त्यांचा वापर कोणत्या उद्देशासाठी होणार होता, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धिरज कोरडे, दिग्वीजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव आणि सोनाली पिसाळ यांनी सहभाग घेतला.

➖➖➖➖➖➖➖➖

कराड क्राईम न्यूज, Karad Crime News, कराड पोलिस कारवाई, Karad Police Action, कराड शहर पोलीस, गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड, Karad Crime Branch, देशी पिस्तुल जप्त, अग्नीशस्त्र जप्त, बेकायदा शस्त्र विक्री, Illegal Firearms Maharashtra, 4 देशी पिस्तुले, 8 जिवंत काडतुसे, कराड ब्रेकिंग न्यूज, Satara Crime News, सातारा गुन्हे बातम्या, Maharashtra Crime News, Karad Breaking News, निखिल पिंगळे, वैशाली कडुकर, राजश्री पाटील, दत्तात्रय दराडे, विजय गोडसे, निखिल मगदुम, Crime News Marathi, Marathi Crime Update, Changbhala News, चांगभलं न्यूज, कराड ताज्या बातम्या, सातारा ताज्या बातम्या, Maharashtra Police, Firearms Seized, Karad Latest News

#ChangbhalaNews #Karad #KaradCrime #KaradPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #Satara #SataraCrime #Maharashtra #PoliceAction #CrimeBranch #IllegalWeapons #Firearms #PistolSeized #GunSeizure #KaradBreaking #LatestNews #MarathiBreakingNews #GunCrime #Agnishastra #KaradCity #SataraNews #MaharashtraPolice #CrimeUpdate #NewsUpdate #TrendingNews #MarathiJournalism #Breaking #Changbhala

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या