🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीला 'एक्सलंट' ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त

 


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून सलग ५ व्या वर्षी गुणवत्तेचा मान प्रदान
 

चांगभलं प्रतिनिधी | कराड
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सालात केलेल्या संस्था सर्व्हेक्षण अहवालात कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीमधील डी. फार्म अभ्यासक्रमाला 'एक्सलंट' हा सर्वोच्च शैक्षणिक दर्जा प्रदान केला आहे. महाविद्यालयाने सलग ५ वर्षे हा सर्वोच्च दर्जा कायम राखत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा अधिक दृढ केली आहे.
 
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत दरवर्षी विविध निकषांच्या आधारे राज्यातील संलग्न तंत्रशिक्षण संस्थांचे मूल्यमापन केले जाते. यामध्ये अध्यापनाची गुणवत्ता, अनुभवी व गुणवत्तापूर्ण प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, विद्यार्थी विकास उपक्रम, शैक्षणिक निकाल, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, संस्थेची शैक्षणिक कार्यपद्धती आणि एकूणच शैक्षणिक वातावरण अशा विविध बाबींचे सखोल परीक्षण करण्यात येते.
 
या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीला यंदाही 'एक्सलंट' ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त झाली आहे. या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्ता, शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
 
कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना सन २००६ मध्ये डी. फार्म अभ्यासक्रमासह झाली. त्यानंतर औषधनिर्माणशास्त्रातील बी. फार्म पदवी अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात आला. अल्पावधीतच बी. फार्मच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक उपक्रम आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून, महाविद्यालयाच्या नावलौकिकात मोलाची भर घातली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖

#कृष्णाफार्मसी #कृष्णाइन्स्टिट्यूटऑफफार्मसी #KaradNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या