🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड दक्षिण मतदारसंघातील लघु पाटबंधारे योजनांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्या; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची नियोजन समितीच्या बैठकीत मागणी



- पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे तात्काळ कार्यवाहीचे आदेश

चांगभलं प्रतिनिधी | कराड

कराड दक्षिण मतदारसंघातील लघु पाटबंधारे योजनांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. या मागणीची तत्काळ दखल घेत, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, धैर्यशील मोहिते-पाटील, नितीन पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदींसह मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत कराड दक्षिणमधील विविध समस्यांबाबत आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुद्देसूद मांडणी करुन, विविध प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आ. डॉ. भोसले म्हणाले, की, सन २०२५-२६ सालात १०१ ते २५० हेक्टर क्षेत्राच्या लघु पाटबंधारे योजनांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील उंडाळे भागातील लघु पाटबंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णपणे रखडली असून, त्याचा थेट फटका टाळगाव, येणपे, मनव आदी भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. या बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणावर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत असल्याने, त्यांची वेळेत दुरुस्ती होणे अत्यावश्यक आहे. तसेच निधीअभावी अनेक आवश्यक कामे प्रलंबित राहिली असून, आगामी हंगामातही शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सन २०२६-२७ च्या चालू अर्थसंकल्पात लघु पाटबंधारे योजनांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करून कराड दक्षिणमधील प्रलंबित बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

यासोबतच त्यांनी लघु पाटबंधारे तलावांवरील विद्युत मोटारी जोडण्याचाही प्रश्न उपस्थित केला. लघु पाटबंधारे तलावांवरील मोटारी जोडण्याचे आदेश अद्याप निघाले नसल्याने नांदगाव, मनव, उंडाळे, घोगाव परिसरातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, या प्रश्नावरही तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबतचे आदेश तातडीने देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली.

➖➖➖➖➖➖➖➖

#सातारा #कराडदक्षिण #अतुलबाबाभोसले #नियोजनसमितीबैठक

#चांगभलं #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या