🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद; फुले जयंती वर्षभर साजरी करण्याची घोषणा, स्मार्ट मीटरला विरोध व बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावर तीव्र टीका

 


हैबत आडके, कराड | चांगभलं


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महात्मा ज्योतिबा फुले जयंती समितीचे राज्याध्यक्ष भानुदास माळी यांच्या उपस्थितीत कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
यावेळी बोलताना भानुदास माळी यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार आहेत. समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला असून, जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून राज्यभर व्यापक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमांची सांगता ११ एप्रिल २०२७ रोजी नायगाव किंवा खंडाळा येथे होणार असून, या कार्यक्रमास राहुल गांधी, अशोक गेहलोत यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्याचा माळी यांनी तीव्र निषेध केला. असे वक्तव्य महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारे असून, बागेश्वर बाबांची सखोल आर्थिक चौकशी करून त्यांच्या निधीचा स्रोत जनतेसमोर आणावा, तसेच त्यांच्यावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.


याचबरोबर आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेचाही निषेध व्यक्त करण्यात आला. आगामी जनगणनेमध्ये ओबीसी व एससी प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याची मागणी करत, ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. जातीनिहाय जनगणना ही सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्मार्ट मीटर योजनेवर टीका करताना माळी म्हणाले की, राज्य सरकारने ३२ हजार कोटींचा करार अदानी समूहाला देत ही योजना राबवली असून ती सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार आहे. रिचार्ज संपल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असून ही योजना तात्काळ रद्द करावी, अन्यथा काँग्रेस राज्यभर आंदोलन उभे करेल, असा इशारा त्यांनी दिला.
कुसुम सोलर योजनेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत, शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला. तसेच, वाढते खासगीकरण, मराठी शाळा बंद करण्याचे प्रयत्न यांनाही काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह युवक काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष देवदास माने यांचा श्री. माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. संभाजीराव मोहिते, काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके , काँग्रेसचे कराड शहराध्यक्ष अॅड. अमित जाधव, माजी नगरसेवक अशोकराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#Congress #KaradNews #ChangbhalaNews


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या