🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मालखेडच्या मैदानावर ‘नखऱ्या-शंभू’ची जोडी ठरली अव्वल ; हनुमान केसरीचा पटकावला किताब!

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड

श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त हनुमान केसरी दिव्य एक आदत एक बैल मैदान २४ एप्रिल२०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी २५० पेक्षा अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. यावर्षी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक बैलगाडा मालकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
या मैदानात प्रथम क्रमांकासाठी २५,०२५ द्वितीय क्रमांकासाठी २०,०२०, तृतीय क्रमांकासाठी १५,०१५ चतुर्थ क्रमांकासाठी १०,०१०, पंचम क्रमांकासाठी ७,००७, सहाव्या क्रमांकासाठी ५,००५ रोख रक्कम व शिल्ड देण्यात आले.
हनुमान केसरी क्रमांक १ -
राजवीर पैलवान वाटेगाव, बंडा टिवले वाटेगाव, भैय्या ड्रायव्हर वाटेगाव, भिमराव आप्पा झेंडे पाचुंब्री, पंकज सावंत मालखेड यांचा 'नखऱ्या' आणि 'शंभू'‌ या बैल जोडीने मानाचा किताब पटकावला.
तर क्रमांक २ - श्री काळम्मादेवी प्रसन्न-बाळुमामा प्रसन्न चि. अंशुमन अभिनंदन सुर्यवंशी मालखेड, प्रसाद शेठ सावंत शेणे, भैय्या ड्रायव्हर वाटेगाव, अजित शेठ साळवी यांचा 'अर्जुन' आणि 'रूबाब' या बैल जोडीने पटकावला.
क्रमांक ३ - जय हनुमान प्रसन्न चि. अर्णव झुंजार काले, सावता माळी बनवडी, अभि झुंजार काले यांचा 'मल्हार' आणि 'लक्षा'
क्रमांक ४ - श्रेयांश रोहन आडके वाटेगाव यांचा 'आमचा देव मोठा लक्षा, पै. कुंडलिक गुजले, अरविंद माने पाचुंब्री भैय्या ड्रायव्हर बांबवडे यांचा 'बॉल' आणि 'पक्षा'
क्रमांक ५ - जय हनुमान प्रसन्न विंग, प्रणाली कुलकर्णी विंग, सोनुशेठ पाचपुते विंग, भैय्या महिपाल विंग, प्रशांत कुलकर्णी विंग, राजा फॅब्रिकेशन नडशी यांचा 'महाराज' आणि 'राजा'
क्रमांक ६- श्री सिद्धिविनायक प्रसन्न हर्षद पाटील, ए.के.ड्रायव्हर पाडळीवाडी, बाबुराव मदने बेलदारवाडी, देवा ग्रुप पाडळीवाडी यांचा 'मल्हार' आणि 'देवा'
क्रमांक ७- तात्यासाहेब चिंधे पाटील, भैय्या ड्रायव्हर बांबवडे, राजवीर पैलवान वाटेगाव, सनी तात्यासाहेब चिंधे पाटील आंबेगाव पुणे यांचा 'गरूडा' आणि 'शंभू' यांनी क्रमांक पटकावला.

या बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहापुर्ण वातावरणात पार पडल्या. यावेळी समालोचक म्हणून विशाल यादव, भैय्या धुमाळ, बबलू कोळेकर झेंडा पंच पै.आबा तांबवे, लाईव्ह व्यवस्था श्री गणेश लाईव्ह यांनी केली.
बैलगाडा शर्यती यशस्वीपणे पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य आयोजक तसेच मालखेड ग्रामस्थ, मालखेड येथील युवक, बैलगाडा प्रेमी यांनी केले.

फोटो ओळ-
मालखेड ; प्रथम क्रमांक पटकाविलेल्या बैलगाडा मालकांस शिल्ड देताना अमर पवार, प्रशांत पवार, संदीप मोहिते, धनंजय ठोंबरे,सागर सावंत, सुरज सावंत, अमोल जाधव व इतर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या