🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

'लालसी' काँग्रेस सोडून पळाले; निष्ठावंत सोबतच !

 


साताऱ्याला महिनाभरातच पक्षाला नवा जिल्हाध्यक्ष देऊ - आमदार मलेंदर राजन

कराड प्रतिनिधी : चांगभलं वृत्तसेवा


स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांवर जोरदार टीका करत, काँग्रेसची खरी ताकद आजही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येच आहे, असा ठाम संदेश हिमाचल प्रदेशचे आमदार मलेंदर राजन यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिला. ‘लालसी’ प्रवृत्तीचे काहीजण पक्ष सोडून गेले असले, तरी विचारधारेवर ठाम राहणारा कार्यकर्ता काँग्रेससोबतच उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशभरात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांना कमकुवत करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न झाले. सरकारे पाडणे, पक्ष फोडणे आणि स्थानिक आघाड्यांमध्ये फूट पाडणे, असे अनेक डाव रचले गेले. मात्र काँग्रेसने हे सर्व प्रयत्न हाणून पाडत आपली राजकीय ताकद टिकवून ठेवली, असा दावा त्यांनी केला.
हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारचे उदाहरण देत, तेथील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातही संघटन मजबूत करण्यासाठी नव्याने उभारणी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
साताऱ्याची राजकीय परंपरा अधोरेखित करताना त्यांनी यशवंतराव चव्हाण यांसारख्या दिग्गज नेतृत्वाची आठवण करून दिली. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्वही सक्षम असल्याचे सांगितले. मात्र अलीकडच्या काळात जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे मान्य करत, आता पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच पार्श्वभूमीवर ‘संघटन सृजन अभियान’ राबवण्यात येत असून, जिल्हा काँग्रेस कमिटीची पुनर्रचना केली जाणार आहे. नव्या नेतृत्वाला संधी देत, संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संघटन सृजन अभियानावर भर 


सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ राबवले जात आहे. या अंतर्गत जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले असून, अनुभवी नेते व पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचाही विचार केला जाणार आहे. नव्या चेहऱ्याला संधी देत संघटनाला नवसंजीवनी देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आता प्रामाणिक कार्यकर्त्यालाच संधी !


"पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आता योग्य संधी दिली जाईल, असे सांगत त्यांनी पुढील एका महिन्याच्या आत सातारा जिल्हा काँग्रेसला सक्षम आणि अनुभवी नवा जिल्हाध्यक्ष मिळेल,"
--- आमदार मलेंदर राजन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कराड #Congress #KaradNews #SataraNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या