🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

दरोडेखोरांची ‘नामी शक्कल’ ; स्टेशनवर रेल्वे येण्यापूर्वीच सिग्नल निष्क्रिय करून 'सह्याद्री एक्सप्रेस'मध्ये केली लूटमार

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


रेल्वे सुरक्षेला चकवा देत नियोजनपूर्वक आखलेल्या धाडसी कटाचा पर्दाफाश कराडजवळ झाला आहे. कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्सप्रेसला लक्ष्य करत दरोडेखोरांनी रेल्वे स्थानकापूर्वीच सिग्नल निष्क्रिय करण्यासाठी नामी शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शुक्रवारी रात्री कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेली सह्याद्री एक्सप्रेस शनिवारी पहाटे सातारा-सांगली सीमेवरील कराड तालुक्यातील शेणोली स्थानकाजवळ आली असता हा प्रकार घडला. रेल्वे येण्यापूर्वीच अज्ञातांनी सिग्नलवर कापड टाकून तो निष्क्रिय केला. सिग्नल न मिळाल्याने चालकाला गाडी थांबवावी लागली आणि याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आपली कारवाई सुरू केली.
गाडी थांबताच चार ते पाच जणांचा टोळका डब्यांजवळ सक्रिय झाला. दरवाजे आणि खिडक्यांजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांना लक्ष्य करत त्यांनी जबरदस्तीने दागिने, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरले; काहींना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही.
सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच शेणोली व भवानीनगर स्थानकांवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अडथळा दूर केला. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली आणि सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली. कराड स्थानकात पोहोचल्यावर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे घडलेला प्रकार नोंदवला.
घटनेची माहिती मिळताच सातारा रेल्वे पोलिस व मिरज लोहमार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले असून, आरोपींचा माग काढण्यासाठी पुणे, सोलापूर आणि मिरज येथून श्वान पथकेही पाचारण करण्यात आली आहेत. मात्र अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही.

रेल्वे थांबली अन् काही मिनिटातच दरोडा...!

या घटनेत सिग्नलमध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून गाडी थांबवण्यात आली. पहाटेच्या वेळेचा फायदा घेत प्रवाशांना लक्ष्य करण्यात आले. काही मिनिटांतच दरोडा टाकून चोरटे पसार झाले. सध्या श्वान पथकांसह रेल्वे पोलिसांकडून व्यापक तपास सुरू आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#सह्याद्रीएक्सप्रेसदरोडा #कराड #KaradCrimeNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या