🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

महायुती एकसंघ; धैर्यशील कदमांच्या विजयाबाबत शिवेंद्रसिंहराजेंचा विश्वास

 


शक्तिपीठ महामार्ग राज्याच्या विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; विरोधकांकडून राजकारण केल्याचा आरोप


हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना सर्व घटक पक्षांचा भक्कम पाठिंबा असून, ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. महायुतीत कोणतीही धुसफूस किंवा अंतर्गत मतभेद नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री भोसले बोलत होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील कथित मतभेदांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सर्व घटक पक्ष निवडणुकीत एकदिलाने काम करत असून धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय आहेत. काही वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावून महायुतीत मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविषयी बोलताना भोसले म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तिपीठ महामार्गामुळे दळणवळण, उद्योग आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात शेतकरी किंवा नागरिकांच्या काही शंका असल्यास त्या शासनाकडे मांडाव्यात; मात्र विकासकामांना विरोध करण्यासाठी काही पक्ष या विषयाचे राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला असून त्याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभाराचा आढावा घेत विविध लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. जनधन योजना, पीएम किसान, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना आणि जलजीवन मिशनमुळे देशातील कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातही महामार्ग, मेट्रो, रेल्वे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित महायुतीच्या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे . तथापि, या अनुपस्थितीचा महायुतीच्या एकजुटीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुती भक्कमपणे एकत्र असल्याचा पुनरुच्चार या पत्रकार परिषदेत केला.



विकासाच्या मुद्द्यावर विरोधक अस्वस्थ...


राज्यात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे विकासाला नवी दिशा मिळत आहे. त्यामुळेच विरोधकांकडून विविध प्रकल्पांविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, विकासाच्या मुद्द्यावर ते अस्वस्थ झाल्याचा टोला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖

#महायुती #भाजप #सातारा #धैर्यशीलकदम #शिवेंद्रसिंहराजेभोसले

#भाजपपत्रकारपरिषद #कराड #सातारासांगली #चांगभलं 

#चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या