🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींमुळे राष्ट्रवादी विचारांना मिळाली नवी दिशा : नीता केळकर

 


भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे कराडमध्ये युवती संमेलन उत्साहात

हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

ज्येष्ठ नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना करून राष्ट्रवादी विचारांना नवी दिशा दिली. अखंड हिंदुस्थान हे त्यांचे स्वप्न होते आणि हिंदुत्वाला न्याय देण्याचे ध्येय त्यांनी आयुष्यभर जपले. ‘एक देश में दो निशान, दो विधान, दो प्रधान नहीं चलेंगे’ ही त्यांची घोषणा राष्ट्राच्या एकात्मतेसाठीचा लढा होता, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातारा जिल्ह्याच्यावतीने कराड येथे आयोजित युवती संमेलनात त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, डॉ. भारती पाटील, कराड पं. स. सभापती नंदाताई यादव, ऐश्वर्यादेवी पाटणकर, भाजपाच्या शहराध्यक्ष सुषमा लोखंडे उपस्थित होत्या.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मरण पक्षनिमित्त आयोजित या कार्यक्रमात ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी : जीवन, कार्य आणि राष्ट्रनिर्माणातील योगदान’ या विषयावर बोलताना नीता केळकर म्हणाल्या, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नातील कलम ३७० हटविण्याचे ऐतिहासिक कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले. राम मंदिर स्थापनेचे स्वप्न मोदी आणि अमित शहा यांनी पूर्णत्वास नेले. आज भारताला जगात महासत्ता बनवण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांना आणि युवतींना न्याय देण्याचे तसेच सक्षम करण्याचे काम करत आहेत.

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तेजस्विनी घोरपडे यांनी युवतींना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात काम करताना सशक्त मन आणि सशक्त शरीर दोन्ही आवश्यक आहे. प्रत्येकाने राष्ट्र आणि समाजासाठी आपले कर्तव्य समजून घेतले पाहिजे. येणाऱ्या पिढीवर संस्कार घडवण्याचे आणि समाजबांधणीचे मोठे कार्य स्त्रिया करू शकतात.

यावेळी डॉ. भारती पाटील, सुनील भिलारे, पैलवान धनंजय पाटील, माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कराडच्या माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, भाजपाच्या माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वाती पिसाळ, कराड दक्षिण महिला मोर्चा अध्यक्ष नीता जाधव, नगरसेविका किशोरी शिंदे, वर्षा वास्के यांच्यासह युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


➖➖➖➖➖➖➖➖➖

#भाजप #युवतीसंमेलन #भाजपामहिलामोर्चा #कराड

#चांगभलं #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या