🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

गोटे ग्रामपंचायत सचिवालयाचा उद्या भव्य उद्‌घाटन सोहळा; पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा मेळावा

 

मा. सौ. सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचा मेळावा होणार.

सौ. सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

कराड, दि. १९ डिसेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा

गोटे ग्रामपंचायत सचिवालयाच्या उद्‌घाटनानिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भूषविणार आहेत. यावेळी मा. सौ. सुनंदा नामदेव पाटील यांचा वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळाही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा संयुक्त कार्यक्रम शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गोटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला आहे.


गोटे ग्रामपंचायत सचिवालयासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून सुसज्ज व आधुनिक इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या सचिवालयाचे भव्य उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या सचिवालयामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतिमान व लोकाभिमुख होणार असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.


या कार्यक्रमास उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून नामदेवराव पाटीलअजितराव पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच गोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच वहिदा शेख, उपसरपंच कोमल लादे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

उद्‌घाटन समारंभानंतर मा. सौ. सुनंदा नामदेव पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून, या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या भव्य मेळाव्यामुळे वारुंजी जिल्हा परिषद गटात राजकीय व सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#GoteGrampanchayat #GoteSecretariat #PrithvirajChavan #SunandaNamdevPatil #CongressMelava #KaradNews #SataraPolitics #GrampanchayatDevelopment #LocalGovernance #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या