🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही धनगर व इतर समाज शिक्षणापासून वंचित; प्रवीण काकडे

 दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य व महिलांना मदतीचे वाटप

कसणी, कोकीसरे गवळीनगर व खोदलापुर येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व महिलांना साडी व सॅनिटरी पॅड वाटप करताना प्रवीण काकडे व उपस्थित मान्यवर


कराड प्रतिनिधी| चांगभलं वृत्तसेवा 

स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होऊनही धनगर व इतर बहुजन समाजातील घटक आजही शिक्षणापासून वंचित असल्याची खंत प्रवीण काकडे यांनी व्यक्त केली. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कसणी, तापाटण, कोकीसरे गवळीनगर (ता. पाटण) तसेच खोदलापुर (ता. शिराळा) येथील डोंगर-दऱ्या खोऱ्यातील जंगलातील दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


या उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती करत दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी कसणी येथील ३१ विद्यार्थी व ३३ महिलांना, कोकीसरे गवळीनगर येथील ३७ विद्यार्थी व ३८ महिलांना तसेच खोदलापुर येथील ७८ विद्यार्थी व ६५ महिलांना लाभ देण्यात आला. एकूण १४६ विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले, तर एकूण १२१ महिलांना साडी व सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रवीण काकडे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले; मात्र आजही बहुजन समाजातील अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, ही अत्यंत शोकांतिका आहे. एकीकडे देशात अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे डोंगर-दऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना पायी सात ते आठ किलोमीटर अंतर चालत शाळेत जावे लागते.


वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. वन्यजीव हल्ल्यांच्या भीतीमुळे अनेक मुले शाळेत जात नाहीत. वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने अनेक महिलांचे प्राण जात आहेत. पावसाळ्यात ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने शाळेत जाणे अशक्य होते. त्यामुळे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने सातत्याने जनजागृती केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला धुळाजी यमकर, बापू जानकर, धाकलु गावडे, पोलीस पाटील सुनिता गावडे, अजित कांबळे, महादु कोडार, कोयल गावडे, लक्ष्मण कोकरे, संतोष कोकरे, रायबा माने, सिताराम जानकर, धोंडीबा शेळकै, विठ्ठल माणेरे यांच्यासह विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#प्रजासत्ताकदिन #धनगरसमाज
#बहुजनशिक्षण #दुर्गमभाग #शैक्षणिकसाहित्य
#महिलासशक्तीकरण #अहिल्यादेवीट्रस्ट
#ऑलइंडियाधनगरसमाजमहासंघ #प्रवीणकाकडे
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या