🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात -- लँडिंगवेळी धावपट्टीवरून बाजूला ; पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात

पुणे | चांगभलं वृत्तसेवा

आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती विमानतळावर एका गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाला, ज्यामुळे विमान धावपट्टीवरून बाजूला झाले.

या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तसेच विमानात सोबत असल्याचे सांगण्यात आलेल्या आणखी पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.


जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आज नियोजित सभा होत्या. त्यासाठी सकाळी ते विमानाने बारामती येथे पोहोचले होते. मात्र, लँडिंगच्या दरम्यान विमानाला अपघात झाला. संपूर्ण प्रशासन आणि आपत्कालीन सेवांकडून घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू असून ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Photo credit - PTI)





➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#अजितपवार #बारामती #विमानअपघात #ब्रेकिंगन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या