अन्वित हुलवान मित्र परिवाराची कराडमध्ये धडाकेबाज एन्ट्री;नेटक्या संयोजनात हजारो कराडकरांनी लुटला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद
युवाश्री ग्रुप आणि अन्वित हुलवान मित्र परिवाराच्या वतीने येथील दत्त चौकात श्री साईबाबा मंदिरलगतच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या युवाश्री दहीहंडीचा थरार हजारो कराडकरांनी अनुभवला. तासगावच्या शिवाजी युवक मंडळाने सात थर लावत तिसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडली. या मंडळास 1 लाख 51 हजार 151 रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
भव्य व्यासपीठ, डिजिटल स्क्रीन, फ्लड लाईट्स, डीजेचा ताल, मान्यवरांची उपस्थिती व हजारो कराडकरांची उपस्थिती अशा वैविध्यपूर्ण वातावरणात सायंकाळपासून सुरू झालेला हा सोहळा रात्री दहापर्यंत सुरू होता. युवा नेते अन्वित हुलवान व नगरपरिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. स्मिता हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या उत्सवास उपस्थित लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले,
कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, अजय पावसकर, नगरसेवक शिवाजी पवार, सुहास जगताप, आशुतोष डुबल,अतुल शिंदे, सुमित जाधव, गणेश पवार, वैभव माने, रणजीतनाना पाटील, संजय शिंदे, मलकापूरचे राजेंद्र आबा यादव यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली.
सायंकाळी पाच वाजल्यापासून हा उत्सव सुरू झाला. रात्री दहापर्यंत गर्दी वाढत गेली. विशेष म्हणजे महिला व युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. डीजेच्या तालावर युवक व युवतींनीही ताल धरला होता. प्रारंभी उत्कृष्ट नृत्य करणार्या चिमुकल्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सांस्कृतिक दहीहंडीचे महिलांकडून कौतुक...
या दहीहंडी उत्सवास उपस्थित असलेल्या महिला व युवतींनी या सांस्कृतिक दहीहंडीचे कौतुक केले. केवळ धांगडधिंगा न होता शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडी पार पडल्याने आम्हालाही दहीहंडीचा आनंद घेता आला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. महिलांसाठी वेगळी व्यवस्था व सुरक्षा करण्यात आल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
युवाश्री दहीहंडी भविष्यात व्यापक होईल...
अन्वित हुलवान मित्रपरिवाराने प्रथमच आयोजित केलेल्या युवाश्री दहीहंडीच्या नेटक्या संयोजनाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कौतुक केले. ही दहीहंडी भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात साजरी करण्यात येईल. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सौ. स्मिता हुलवान व अन्वित हुलवान यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या अन्वित हुलवान या नवनेतृत्वाने या सोहळ्याच्या निमित्ताने लक्ष वेधून घेतले. दहीहंडी ही सांस्कृतिक असावी, असा कटाक्ष ठेवून संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत असणाऱ्या आन्वितने कर्तृत्वातून नेतृत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे.
➖➖➖➖➖➖
#KaradNews #युवाश्रीदहीहंडी #अन्वितहुलवान #कराडशहर #दहीहंडीउत्सव #स्मिताहुलवान #Karadkar #शिवाजीयुवकमंडळतासगाव #चांगभलं #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews #अतुलबाबाभोसले #KaradCityNews #Satara






0 टिप्पण्या