🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर; सातारा-कराडमध्ये वाहतूक पोलिसांची एकाच वेळी कारवाई

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड


मॉडिफाय सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर करून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या वाहनचालकांना आता वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. सातारा आणि कराडमध्ये पहिल्यांदाच सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वय साधत एकाच वेळी कारवाईचा धडाका लावला. जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सर कराडच्या विद्यानगर येथे बुलडोझरखाली अक्षरशः चिरडून नष्ट करण्यात आले. साताऱ्यातही पोवई नाका येथे जप्त सायलेन्सर अशाच पद्धतीने नष्ट करण्यात आले.

या विशेष कारवाईत मॉडिफाय सायलेन्सरचे २८१, फॅन्सी नंबर प्लेटचे १७०, प्रेशर हॉर्नचे १८३ आणि सायरनचे ४३ असे एकूण 677 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस, कराड शहरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे तसेच सातारा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.



मॉडिफाय सायलेन्सरमुळे निर्माण होणारा कर्णकर्कश आवाज, नियमबाह्य हॉर्न, सायरन आणि फॅन्सी नंबर प्लेटमुळे होणारे नियमांचे उल्लंघन याविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
कारवाई करून सोडणार नाही, तर जप्त केलेले सायलेन्सरच नष्ट करू असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. यापुढेही मॉडिफाय सायलेन्सर बसविणे, नियमबाह्य आवाजाचे हॉर्न अथवा सायरन वापरणे आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणे सुरूच ठेवल्यास संबंधित वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
विशेष म्हणजे सातारा आणि कराडसह जिल्हा वाहतूक शाखेच्या समन्वयातून पहिल्यांदाच अशा पद्धतीने एकाच वेळी कारवाई करण्यात आल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.


➖➖➖➖➖➖➖

#कराड #वाहतूकपोलीस #मॉडीफायसायलेन्सर #CrimeNews #ChangbhalaNews #चांगभलंन्यूजपेपर #चांगभलं #SataraPolice #KaradCityNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या