चांगभलं प्रतिनिधी | कराड
माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या भगिनी तथा श्री. अनिल राजाराम काटे यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय सौ. आशाताई अनिल काटे यांचे बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ५९ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
स्व. आशाताई यांच्या निधनाने काटे कुटुंबीयांसह नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. त्यांच्या प्रेमळ आठवणी सदैव स्मरणात राहतील.
स्व. आशाताई यांच्या पश्चात पती,दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव बेलदरे, ता. कराड, जि. सातारा असून सध्या त्या कराड-वाकाण रोड तेथील पर्ल रेसिडेन्सी येथे वास्तव्यास होत्या.
रक्षाविसर्जन विधी : रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता वैकुंठधाम, कराड येथे होणार आहे.
➖➖➖➖➖➖
#आशाताईकाटेनिधन #कराड #KaradNews #निधनवार्ता

0 टिप्पण्या