🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

ऊसदरासाठी विविध पक्ष व संघटनांकडून तांबवे फाटा येथे रास्ता रोको; दोन्ही बाजूंना पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

 साखरेची एमएसपी प्रतिकिलो ५० रुपये करण्याची अॅड. भाई समीर देसाई यांची मागणी; पाऊण तास वाहतूक ठप्प




हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड


ऊसदराच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा व यशवंत शेतकरी संघटना आणि रासप यांच्यावतीने तांबवे फाटा येथे आज (रविवारी ) संयुक्त रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, सुमारे पाऊण तास वाहतूक ठप्प झाली.


यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. भाई समीर देसाई यांनी साखरेच्या किमान विक्री किमतीत (एमएसपी) वाढ करण्याची मागणी केली. ते म्हणाले, की गेल्या आठ वर्षांपासून साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, या काळात उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. साखरेचा उत्पादन खर्च पाचपट वाढल्याचे नमूद करत त्यांनी सध्याच्या परिस्थितीत ऊस उत्पादनाचा खर्च भागविणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे सांगितले.
बाजारात सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. मात्र, साखरेचे दर वाढविण्याचा विषय आला की त्याला विरोध केला जातो. केंद्र सरकारने साखरेची एमएसपी प्रतिकिलो ५० रुपये निश्चित केल्यास साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना वाढीव ऊसदर देणे शक्य होईल. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करावी, अशी मागणी अॅड. देसाई यांनी आपल्या भाषणातून केली.



यावेळी चंद्रकांत यादव यांनी ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस घालू नये, असे आवाहन केले.
या आंदोलनात महेश जिरंगे, शिवाजीराव पाटील, अॅड. अमित लाड, संदीप साळुंखे, प्रल्हाद माने आणि गणेश शेवाळे यांनीही आपली भूमिका मांडली.
ऊसदराच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या संयुक्त आंदोलनामुळे तांबवे फाटा परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

➖➖➖➖➖➖
#चांगभलंन्यूज #ऊसदरआंदोलन #ऊसदर #शेतकरीआंदोलन #तांबवेफाटा #शेतकरीकामगारपक्ष #बळीराजासंघटना #यशवंतशेतकरीसंघटना #रासप #साखरएमएसपी #शेतकरीप्रश्न #कराड #सातारा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या