🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

राहुल गांधींसोबत नामदेव पाटील (आप्पा) यांच्या कुटुंबीयांचा संवाद; सातारा भेटीचे निमंत्रण

 


चांगभलं प्रतिनिधी | नाशिक

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांच्या राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराची सांगता बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. दहा दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांनाही विशेष निमंत्रण देण्यात आले होते.

यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित प्रत्येक जिल्हाध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांशी परिचय करून घेत आपुलकीने संवाद साधला. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील आप्पा यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील माई, मुलगा सत्यजित पाटील, कन्या स्नेहल पाटील, नातू देवराज पाटील तसेच भाऊ मुकुंद पाटील यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.
संवादादरम्यान नामदेव पाटील आप्पा यांनी सातारा जिल्हा हा स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा लाभलेला जिल्हा असून हजारो विद्यार्थी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचे सांगत त्यांना सातारा जिल्ह्याला भेट देण्याचे निमंत्रण दिले. तसेच माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांच्याशी झालेल्या या भेटीमुळे नामदेव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विशेष समाधानाचे वातावरण असून, भविष्यात सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घडवून आणण्यासाठी दिल्ली येथे वेळ घेऊन पुन्हा भेट घेणार असल्याची माहिती नामदेवराव पाटील यांनी दिली.

"राहुल गांधी यांच्यासोबतचा हा संवाद प्रेरणादायी ठरला असून, काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली," असेही नामदेव पाटील आप्पा यांनी यावेळी सांगितले.


➖➖➖➖➖➖

#नामदेवरावपाटील #साताराकाँग्रेस #राहुलगांधी #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews #KaradNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या