🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

गुणवत्तेचे परिमाण वेगवेगळे असते ; ॲड. भारत मोहिते

 

कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक येथे आयोजित जयंत करिअर सप्ताहात ॲड. भारत मोहिते यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक जे. बी. माने व शिक्षकवृंद.

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

आजच्या स्पर्धात्मक युगात यशाची एकच व्याख्या नसून प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता, आवड व क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे गुणवत्तेचे परिमाणही वेगवेगळे असतात, असे प्रतिपादन ॲड. भारत मोहिते यांनी केले. कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक येथे आयोजित जयंत करिअर सप्ताहातील दुसऱ्या पुष्पात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. कोणी अभ्यासात प्रावीण्य मिळवतो, तर कोणी कला, क्रीडा, तंत्रज्ञान किंवा व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्यामुळे स्वतःच्या गुणवत्तेची ओळख करून ती विकसित करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. केवळ गुणपत्रिकेतील मार्क्स म्हणजेच गुणवत्ता नसून, कौशल्य, आत्मविश्वास, मेहनत व चिकाटी यालाही तितकेच महत्त्व आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज नोकरीबरोबरच व्यवसाय, स्वयंरोजगार, स्टार्टअप्स यांसारख्या विविध संधी उपलब्ध आहेत. आपल्या गुणवत्तेनुसार योग्य क्षेत्र निवडल्यास यश निश्चित मिळते. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाणे गरजेचे आहे, असेही भारत मोहिते यांनी नमूद केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. बी. माने यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा द्यावी. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून भविष्यातील करिअरविषयी स्पष्टता येते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. पोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. डी. वाबळे यांनी मानले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#JayantCareerWeek #CareerGuidance
#QualityOfEducation #StudentMotivation
#BrahmdasVidyalaya #KasegaonEducation
#KaradEducation #YouthGuidance
#SkillDevelopment #SelfConfidence
#ChangbhalaNews #EducationalNews
#CareerAwareness #FutureReadyStudents

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या