कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. भव्य व दिव्य अशा या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो. नितीन कुदळे, असिस्टंट गव्हर्नर रो. जगदीश वाघ व असिस्टंट गव्हर्नर रो. अँड. नरेंद्र शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रोटरी क्लब ऑफ कराडचे प्रेसिडेंट रो. डॉ. शेखर कोगनूळलकर, सेक्रेटरी रो. विनायक राऊत, न्यू क्लब ॲडव्हायझर रो. विकास देसाई, रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडचे चार्टर प्रेसिडेंट रो. निळकंठ देसाई व चार्टर सेक्रेटरी रो. रमेश बागल उपस्थित होते. याशिवाय कॉप्सचे पदाधिकारी, कॉप्स अंतर्गत क्लबचे सर्व पदाधिकारी, मानद सदस्य, इनरव्हीलचे पदाधिकारी, रोटरी क्लब ऑफ कराडचे सदस्य व कुटुंबीय, रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडचे सदस्य व कुटुंबीय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बालशाहीर प्रियांश यांच्या पोवाडा व शिवगर्जनेने झाली. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ कराडचे प्रेसिडेंट रो. डॉ. शेखर कोगनूळलकर यांनी कॉल टू ऑर्डर करून कार्यक्रमास प्रारंभ केला. त्यांच्या हस्ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे व डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो. नितीन कुदळे यांचे स्वागत करण्यात आले.
सुरुवातीस रो. डॉ. शेखर कोगनूळलकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर न्यू क्लब ॲडव्हायझर रो. विकास देसाई यांनी नव्या क्लबच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुणे रो. सुधीर लातूरे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडचे चार्टर प्रेसिडेंट रो. निळकंठ देसाई व चार्टर सेक्रेटरी रो. रमेश बागल यांना कॉलर व पिन प्रदान करण्यात आले तसेच अधिकृत चार्टर बहाल करण्यात आले.
यानंतर संस्थापक संचालक व सर्व संस्थापक सदस्यांना पिन व सदस्य प्रमाणपत्र देण्यात आले. क्लबच्या ‘सेवाभाव’ या बुलेटीनचे प्रकाशनही डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे यांच्या हस्ते करण्यात आले. मानद सभासदांना सदस्य प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तीन विशेष पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
चार्टर प्रेसिडेंट रो. निळकंठ देसाई यांनी आपल्या मनोगतातून क्लबच्या भावी कार्याचा आराखडा व अपेक्षा मांडल्या. डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो. नितीन कुदळे यांनी रोटरी क्लब ऑफ कराड व रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडचे तोंडभरून कौतुक करत, नवख्या क्लबने जुन्या क्लबनाही लाजवेल असा भव्य कार्यक्रम आयोजित केल्याचे नमूद केले. असिस्टंट गव्हर्नर रो. जगदीश वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे यांनी रोटरीचे कार्य, उद्दिष्टे व नव्या क्लबकडील अपेक्षा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ कराड व रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडतर्फे चार्टर प्रेसिडेंट रो. निळकंठ देसाई यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे, डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो. नितीन कुदळे, असिस्टंट गव्हर्नर रो. जगदीश वाघ, असिस्टंट गव्हर्नर रो. नरेंद्र शेलार व रोटरी क्लब ऑफ कराडचे प्रेसिडेंट रो. डॉ. शेखर कोगनूळलकर यांचा सत्कार केला. चार्टर सेक्रेटरी रो. रमेश बागल यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ कराडचे सेक्रेटरी रो. विनायक राऊत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चार्टर रो. भास्कर यादव यांच्या हस्ते न्यू क्लब ॲडव्हायझर रो. विकास देसाई यांचा गौरव करण्यात आला.
सत्काराचे स्वरूप कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील पुस्तक, एक रोप व गुळाची ढेप असे होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चार्टर सेक्रेटरी रो. रमेश बागल यांनी केले. चार्टर प्रेसिडेंट रो. निळकंठ देसाई यांनी मीटिंग अॅडजर्न करून कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. विकास पाटील व रो. निशिकांत पाटील यांनी केले. पदग्रहण सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर, विविध क्लबचे पदाधिकारी, सदस्य व कुटुंबीय तसेच काले परिसरातील ग्रामस्थांनी रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराडतर्फे आयोजित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.


0 टिप्पण्या