🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

ब्रह्मदास विद्यालयात ७ वी स्कॉलरशिप पालक सभा संपन्न

 

बेलवडे बुद्रुक पालक सभेत बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक जे बी माने

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक येथे इयत्ता ७ वी स्कॉलरशिप परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पालक मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक जे बी माने यांनी आपल्या मार्गदर्शनातून
स्कॉलरशिप परीक्षेचे महत्त्व, परीक्षेची रचना आणि विद्यार्थ्यांनी करावयाची तयारी . बुद्धिमत्ता चाचणी तसेच भाषा व गणित या विषयांच्या पेपरची माहिती देत नियमित व नियोजनबद्ध अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.
विभाग प्रमुख पी टी पाटील यांनी सांगितले की, दररोज ठराविक वेळ अभ्यास करणे, सराव प्रश्नपत्रिका सोडविणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे विद्यार्थ्यांनी आवश्यक आहे.
पालकांनी घरात अभ्यासपूरक वातावरण निर्माण करावे, मोबाईल व दूरदर्शनचा वापर मर्यादित ठेवावा तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सकारात्मक पाठबळ द्यावे, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती व पालक–शिक्षक संवाद यांचे महत्त्व अधोरेखित करत “पालक व शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यालयाचा निकाल निश्चितच उत्कृष्ट लागेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहा शिक्षक जी व्ही रणदिवे यांनी शाळेमार्फत विशेष मार्गदर्शन वर्ग, टेस्ट सिरीज व शंका निरसन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका वहिदा अत्तार , सहा शिक्षक बी ए भोसले, पी के बांबरे, व्ही एस कामडी, आय सी टी टीचर पल्लवी मोहिते तसेच मनाली सूर्यवंशी, दिशा कुंभार, एस एस इंगोले, स्वप्नील सुतार तसेच पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या