🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा उर्वरित २० टक्के निधी तात्काळ मंजूर करा

 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा विधानसभेत औचित्याचा मुद्दा

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झालेला असून, शासनाने उर्वरित २० टक्के निधी तत्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडताना केली.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, योजनेच्या प्रलंबित निधीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.

ते म्हणाले, उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. दरम्यानच्या काळात या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या १७ गावांपैकी काही गावांनी स्वतःच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवल्यामुळे, त्या गावांना आता या प्रादेशिक योजनेतील पाण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे योजनेच्या मूळ आराखड्यात आवश्यक बदल करून प्रत्यक्षात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

उंडाळे योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झालेला असून, केवळ २० टक्के खर्च शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्यास ही योजना लवकर कार्यान्वित होऊ शकते. तसेच याचा लाभ कराड दक्षिणमधील कोयना वसाहत, नांदलापूर या गावांसह मलकापूर शहराच्या विस्तारित भागाला करुन देता येईल. म्हणूनच शासनाने आतापर्यंत गुंतवलेला मोठा निधी वाया जाऊ नये आणि खऱ्या अर्थाने पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळावा, यासाठी योजनेच्या पूर्णत्वासाठी उर्वरित २० टक्के निधी द्यावा. तसेच योजनेची पुनर्रचना करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती आ.डॉ. भोसले यांनी शासनाकडे केली.


#KaradNews #Karadkar #Karad #ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या