🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी कराडची सामूहिक शपथ! ‘रस्ता सुरक्षा दौड २०२६’ मध्ये अडीच हजार स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
रस्ते अपघातांच्या रोखण्यासाठी सुरक्षित वाहन चालविणेचा आणि सुदृढ आरोग्याचा दुहेरी संदेश देत कराडकरांनी जबाबदार नागरिकत्वाचे प्रेरणादायी दर्शन घडवले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्या पुढाकारातून शनिवारी (दि. २८) सकाळी सातच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा दौड २०२६’ या जनजागृती उपक्रमात सुमारे अडीच हजार स्पर्धक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

‘जीवनरक्षा… रस्ता सुरक्षा’ या प्रभावी घोषवाक्याखाली प्रतिसंगम कृष्णा घाट येथून पहाटे दौडीचा शुभारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी होत असलेल्या या उपक्रमाने यंदा अधिक व्यापक आणि संघटित रूप धारण केले.
दुचाकीस्वार व पादचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूंमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर ‘दुचाकीस्वार व पादचारी वाचवा’ हा मुख्य संदेश दौडीद्वारे देण्यात आला. कराड व पाटण तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था व संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक प्रविण पवार, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंम्पे, पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील, कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभुते, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सुर्यवंशी, उद्योजक रणजीत पाटील, सचिन पवार, नवनाथ पालेकर, दत्तात्रय देसाई, सतीश वेताळ, गणेश भिसे, अमर शिंदे, भूषण शहा, कुमार ओसवाल, काका देशमुख, दादाराजे देसाई, जीवन सावंत, भरत पवार, शंकर खबाले, रितेश शहा, श्री सचदेव, अॅड. जनार्दन बोत्रे, दिलीप पाटणकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय माधवान, मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सुदर्शन देवढे, स्वप्निल कदम, सागर विश्वासराव, सुरेश आगवणे, धनंजय हिले, समीर सावंत, शिऱीष पोकळे, संदीप कुंभार, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भारत गोरड, शिवनी सर्ग्रे, शितल घाडगे, रजनी पाटोळे, अनुजा मोहिते, मयुरी रजपूत, श्रद्धा माने, सुरभी घार्गे तसेच जय मोटर्स व कणसे हुंडाईचे प्रतिनिधी उपस्थित होते.



या उपक्रमाचे आयोजन प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वागुले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांच्या समन्वयातून करण्यात आल्याचे सांगत मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी, रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून, ती जीवनरक्षणाची चळवळ असल्याचे सांगितले. या उपक्रमाद्वारे केलेली दृढ प्रतिज्ञा प्रत्येकाने आयुष्यभर पाळावी. वाहनाच्या संदर्भात आपल्या वागणुकीत अनुकूल बदल होतील, तेव्हाच ही दौड सर्वार्थाने यशस्वी होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, सुरक्षित रस्ते आणि तंदुरुस्त नागरिक हीच प्रगतीची खरी पायाभरणी असल्याचे नमूद केले.



अधिकाऱ्यांनी दाखवला आदर्श...


या जनजागृती दौडमध्ये कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंम्पे आणि कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी सपत्नीक पाच किलोमीटरची दौड पूर्ण करत ‘जे सांगतो ते आचरणात आणतो’ हा आदर्श समाजासमोर ठेवला. दौड पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


दौडचा मार्ग ठरला जनजागृतीचा रस्ता....


दौडीचा मार्ग कृष्णा घाट – चावडी चौक – मुख्य बाजारपेठ – दत्त चौक – विजय दिवस चौक – कृष्णा नाका – कन्याशाळा मार्गे पुन्हा चावडी चौक आणि कृष्णा घाट असा निश्चित करण्यात आला होता. सुमारे पाच किलोमीटरचा हा मार्ग प्रवासी वाहनांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृतीचाच रस्ता ठरला.


विजेत्यांचा झाला सन्मान.....


स्पर्धात्मक गटात पुरुष व महिला गटातील प्रथम तीन क्रमांक जाहीर करण्यात आले.
पुरुष गट : प्रथम - अथर्व शंकर ताटे, द्वितीय - धनराज खोत, तृतीय - सुरज शिरतोडे.
महिला गट : प्रथम - रिया गोंडाळ, द्वितीय - राणी गावडे, तृतीय - धनश्री बुरुड.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



पारंपारिक आणि आधुनिक संगीताचा संगम.....


रस्ता सुरक्षा दौडच्या निमित्ताने उत्साह आणि जनजागृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी येथील विद्यार्थ्यांच्या पारंपारिक लेझीमने उपस्थित नागरिकांनाही ठेका धरायला भाग पाडले. तर डॉल्बीच्या आधुनिक ठेक्यावर मुक्तपणे थिरकणाऱ्या तरुणाईमुळे या कार्यक्रमात उत्साह निर्माण झाला.


#Karad #karadCity #KaradNews #Karadkar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या