🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष बैठक घेऊन उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावणार

 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीवर पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ग्वाही

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेऊन, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना विधानसभेत दिली.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, उंडाळे योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झालेला असून, केवळ २० टक्के खर्च शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्यास ही योजना लवकर कार्यान्वित होऊ शकते. या योजनेअंतर्गत १८ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने प्रकल्पातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली.

यावर उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन संपण्यापूर्वीच संबंधित विभागांची विशेष बैठक घेऊन प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाईल व ती कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

यामुळे उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत मंत्रालयात केव्हा बैठक होते, याकडे या भागातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या