🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड विमानतळ विस्तारासह राज्याच्या प्रगतीला नवी गती देणारा अर्थसंकल्प : आ.डॉ. अतुलबाबा भोसले

 


अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याला 'नेमकं' काय मिळालं !

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्राला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कराड येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा ना. फडणवीस यांनी केली असून, कराडसह संपूर्ण जिल्ह्याच्या व राज्याच्या प्रगतीला नवी गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत मत मांडताना आ.डॉ. भोसले म्हणाले, की कराड येथील विमानतळाचा विस्तार झाल्यास या भागाचा प्रमुख शहरांशी हवाई संपर्क वाढण्यास मदत होणार आहे. तसेच या परिसरातील उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. जलद वाहतुकीच्या सुविधेमुळे उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेली लॉजिस्टिक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नव्या गुंतवणुकीसाठीही हा परिसर महत्वाचा ठरेल. यामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असून, कराडच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबद्दल आ.डॉ. भोसले यांनी मुख्यमंत्री ना. फडणवीस आणि भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

आ.डॉ. भोसले म्हणाले, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक मूल्य साखळी विकसित केली जाणार आहे. तसेच ‘महाविस्तार-एआय’सारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव यासंबंधी मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर साकारण्यात येणारा रोप वे प्रकल्प आणि दरे येथे उभारण्यात येणारा निसर्ग केंद्र प्रकल्प पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याचबरोबर राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक, प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रांची उभारणी, ग्रामीण भागातील रस्ते विकास तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती आणि उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्याचा सरकारचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसत आहे. एकूणच हा अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीचा आणि जनसामान्यांच्या हिताचा असून शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण उद्योजक आणि मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी नमूद केले आहे.

अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याला काय मिळाले...!

दरम्यान, या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील शेतकरी, पर्यटन, वारसास्थळांचे जतन, आरोग्य या क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा वासोटा किल्ला: मुनावळे ते वासोटे किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन, जिर्णोद्धार यासाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती 11 एप्रिल 2026 रोजी आहे. या निमित्ताने एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी उपलबध करुन देण्यात येणार आहे. महात्मा फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील मौजे कटगुण येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ता. खंडाळा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे.

दरे ता. महाबळेश्वर येथे निसर्गोपचार केंद्र, ताणतणाव, जीवनशैलीजन्म आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी निसर्गोपचार केंद्र उभारले जाणार आहे. कराड विमानतळांच्या विस्ताराच्या कामांसाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना करण्यात आली आहे. यामध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या