🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडच्या कृष्णामाई यात्रा महोत्सवाला जल्लोषात प्रारंभ सोमवारी मुख्य सोहळा; पाच दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णामाईच्या चैत्री यात्रा महोत्सवाची गुरुवारी सायंकाळी भव्य आणि पारंपरिक पालखी मिरवणुकीने उत्साहात सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून, सोमवारी (दि. ६) मुख्य सोहळा रंगणार आहे.
हनुमान जयंतीच्या शुभदिनी सायंकाळी श्रीकृष्ण दत्तात्रय आवटे (पुजारी) यांच्या निवासस्थानातून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मोठ्या भक्तिभावाने निघाली. सुवासिनींच्या पारंपरिक पूजनाने मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषात निघालेली ही पालखी शहरातील प्रमुख मार्गांवरून जात कृष्णा-कोयना नद्यांच्या पवित्र संगमावरील कृष्णा घाटावर पोहोचली.
घाटावर उभारलेल्या मंडपात पालखीचे विधिवत स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. त्यानंतर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, पुढील काही दिवस मंदिर परिसरात पूजाअर्चा, कीर्तन, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, कराडकरांसह बाहेरील भाविकांचीही मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #ChangbhalaNews #Karad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या