🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

सामाजिक कार्याचा गौरव : प्रवीण काकडे यांना ‘महाराजा यशवंतराव होळकर’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथील रहिवासी व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आदिवासी धनगर साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार सोहळा दि. ११ व १२ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे अहिल्यादेवी होळकर वाडा येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर, श्रीमंत अमरजीत राजे जहागीरदार (तळोदा संस्थान, नंदुरबार), खासदार रामराव वडकुते (परभणी), आमदार गोपीचंद पडळकर, डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ), संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर, बाळासाहेब कर्णवर पाटील (व्हाइस चेअरमन, श्री सदगुरू साखर कारखाना, राजेवाडी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रवीण काकडे हे गेली अनेक वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी विशेषतः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठे योगदान दिले आहे. कोरोना काळात त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या सात जिल्ह्यांतील डोंगरदऱ्यांतील वाडी-वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली.
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराडचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो, तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त २०२५ मध्ये कराड, पुणे व नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कराड येथे १४६ महिलांना, पुण्यात ९० महिलांना आणि नवी मुंबईत १४१ महिलांना सन्मानित करण्यात आले. तसेच कराड येथे २४५ विद्यार्थ्यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार देऊन एकाच वेळी गौरविण्यात आले.
प्रवीण काकडे यांच्या कार्याची दखल घेत २०१९ मध्ये भारत सरकारच्या अॅम्युनिशन फॅक्टरी, पुणे यांच्या वतीने ‘समाजरत्न’ पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर २०२३ मध्ये एमआयटी कॉलेज, पुणे येथे ‘राष्ट्रीय जीवनगौरव’ पुरस्कार, तसेच सिने अर्क प्रोडक्शन, मुंबई यांच्या वतीने ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातील धनगर समाज आणि विविध स्तरांतून आनंद व्यक्त केला जात आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #DhangarSamaj #PravinKakade

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या