श्री. मुंबादेवीच्या मंदिराचा वर्धापन दिन साजरा
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कोळेवाडी येथील श्री. मुंबादेवी मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमप्रसंगी के. एम. पाटील यांच्यावतीने त्यांचे कुटुंबीयांनी एक रंगीत व एक कृष्णधवल प्रिंटर मुख्याध्यापीका सौ. भारती लोकरे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आयोजित शैक्षणिक साहित्या प्रदान कार्यक्रमात अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुनिल पाटील म्हणाले, श्री. मुंबादेवीच्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त गावातील प्राथमिक शाळेतील मुलांच्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. पुढील वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती योजना राबवन्याचा मानस आहे.
यावेळी सौ. भारती लोकरे म्हणाल्या, के. एम. पाटील यांची शिक्षणाविषयी असलेली तळमळ, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि शाळेबद्दलचा जिव्हाळा यामुळे प्रत्येक वर्षी के. एम. पाटील यांचेकडून गावाप्रती शैक्षणिक,सामाजीक व धार्मिक योगदान लाभते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया भक्कम करण्यासाठी आपल्या उदात्त कार्याला मनःपूर्वक प्रणाम व धन्यवाद!
यावेळी संतोष पाटील म्हणाले, श्री. मुंबादेवीच्या मंदिरामधील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी कोळेवाडी व परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कोळेवाडी गावचे सुपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एन पी फिश कंपनीचे मालक के. एम. पाटील यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते. शैक्षणिक साहित्याचे वाटप ही शाळेसाठी गरजेची बाब आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अद्यापही डिजिटल साधनांपासून वंचित आहेत. ऑनलाइन शिक्षण, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, डिजिटल लायब्ररी यांचा योग्य वापर झाल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो.
के. एम. पाटील यांचे वडिल (स्व.) महादेव सदोजी पाटील यांनी उभारलेल्या श्री. मुंबादेवीच्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षि चैत्र महिन्यात मंदिराच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यानिमित्त महाअभिषेक, सत्यनारायन पूजा, दूर्गा सप्तशती पाठ भजन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या कर्यक्रमाचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी गावातील प्रथमिक शाळेसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.
या उपकरणांमुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प, उपक्रमपत्रिका, चित्रमय साहित्य तयार करण्यास मदत होईल तसेच शिक्षकांना अध्यापन अधिक प्रभावीपणे करता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
गावाबद्दलची आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्कृष्ट उदाहरण श्री के. एम. पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी घालून दिले आहे. त्यांच्या या उदात्त कार्याबद्दल शाळा परिवाराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानन्यात आले. त्यांच्या या उदार दातृत्वामुळे शाळेतील मुलांची शैक्षणिक गरज पूर्ण होऊन शैक्षणिक कार्याला नवे बळ प्राप्त होणार आहे. संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे प्रश्नसंच तयार करता येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस नक्कीच चालना मिळेल.

0 टिप्पण्या