🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड तालुक्यातील भोळेवाडीत वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी; परिसरात हळहळ


 

कराड, दि. ४ एप्रिल : चांगभलं वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील भोळेवाडी (ता. कराड) येथे शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) दुपारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरींसह विजांचा कडकडाट सुरू होऊन वीज कोसळली. त्यामध्ये शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याची पत्नी देखील वीजेच्या धक्क्याने जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव सतीश नाथा सूर्यवंशी (वय ५१, रा. भोळेवाडी, ता. कराड) असे असून, या दुर्दैवी घटनेतील त्यांच्या जखमी पत्नीचे नाव उषा सतीश सूर्यवंशी असे आहे.

घटनेची माहिती अशी : सतीश सूर्यवंशी हे आपल्या पत्नी व भावजयीसह 'माळ' नावाच्या शिवारातील आपल्या शेतात भांगलणीचे काम करत होते. दुपारी अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने ते दोघे पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. याच वेळी अचानक त्या झाडावर वीज कोसळली. झाडाला टेकून उभ्या असलेल्या सतीश सूर्यवंशी यांना विजेचा जबर धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी उषा काही अंतरावर उभ्या होत्या, त्यामुळे त्यांना देखील धक्का बसला आणि त्या जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी उषा सूर्यवंशी यांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उंब्रज पोलीस ठाणे व महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे भोळेवाडी व आसपासच्या परिसरात शेतकरी वर्गामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सतत धोका असल्याने, शेतात काम करताना वीज कडकडाट सुरू झाल्यास झाडाखाली किंवा उंच ठिकाणी उभे राहू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #ChangbhalaNews #Umbraj

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या