🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

ओंड परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचेकडून पाहणी, तात्काळ पंचनाम्यांचे आदेश

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड दक्षिणमधील ओंड परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागात घरांची व गोठ्यांची पडझड तसेच शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. तसेच या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करुन, बाधितांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

कराडच्या ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. ओंड येथील थोरात मळा आणि शिंदे मळा परिसरात अनेक कुटुंबांची घरे मोठ्या प्रमाणात कोसळली आहेत. तसेच गोठ्यांची छप्परे उडून गेल्यामुळे जनावरांचेही नुकसान झाले आहे. याचबरोबर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

या नुकसानीची पाहणी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आ.डॉ. भोसले यांनी नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करुन, नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या परिसरात ज्वारी, ऊस आणि कलिंगड अशा पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

 



या पाहणीनंतर आ. डॉ. भोसले यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता स्वप्निल जाधव, कनिष्ठ अभियंता निखिलेश बाद्रायणी, माजी उपसरपंच कृष्णत थोरात, प्रकाश थोरात, महादेव थोरात, भाऊसाहेब थोरात, भरत थोरात, चंद्रकांत थोरात, राजेंद्र थोरात, अभिजीत कोठावळे, बबन जाधव, सुनील जाधव, वैभव थोरात यांच्यासह कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या