🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मारूल हवेलीला ‘पाण्याचा दिलासा’; चार महिन्यांच्या टंचाईनंतर जलपुरवठा पुन्हा सुरळीत

 


सारंग पाटील यांच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांची भागली तहान


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
पाटण तालुक्यातील गांधीटेकडी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई जलसिंचन योजना ठप्प झाल्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईने हैराण झालेल्या मारूल हवेली गावाला अखेर मोठा दिलासा मिळाला. गावचे नेते व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पदाधिकारी सारंग पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असून, ऐन उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागवण्यात यश आले आहे.

थकीत पाणीपट्टीमुळे डिसेंबरपासून ही जलसिंचन योजना बंद होती. ही योजना मारूल पंचक्रोशीतील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठा आधार आहे. मात्र योजना ठप्प झाल्याने गेल्या चार महिन्यांपासून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागण्याची वेळ आली होती.
मारूल हवेलीमध्येही मागील दोन आठवड्यांत परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. या गंभीर स्थितीची दखल घेत सारंग पाटील यांनी गावातच मुक्काम करत विविध संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतीने गांधीटेकडी इरिगेशन संस्थेकडून पाणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
सध्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असून, पुढील टप्प्यात शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी २००२ सालीही अशाच प्रकारची पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सहकार्याने योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली होती. यंदाही सारंग पाटील यांच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.


‘सारंग पाटील यांचा थेट हस्तक्षेप ठरला निर्णायक’

मारूल हवेलीतील बिकट पाणीस्थिती लक्षात घेऊन सारंग पाटील यांनी प्रत्यक्ष गावात तळ ठोकत प्रशासन, ग्रामपंचायत आणि इरिगेशन संस्थांमध्ये समन्वय साधला. त्यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने पाणी खरेदीचा निर्णय घेतल्यामुळेच अल्पावधीत पाणीपुरवठा पूर्ववत होऊ शकला. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांना तातडीचा दिलासा मिळाला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#मारूलहवेली #सारंगपाटील #राष्ट्रवादीशरदचंद्रपवारपक्ष

#साताराजिल्हा #पाटण #KaradNews #ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या