🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड तापले ! पारा ४१ अंशांवर; पुढील पाच दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


एप्रिलच्या अखेरीस कराडसह सातारा जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढला असून रविवारी कराड शहराचा कमाल तापमानाचा पारा तब्बल ४१.३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. सकाळीच ऊन चांगलेच चढू लागले होते आणि दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच तीव्र झाली. ११ नंतर रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या घटली, तर दुपारच्या सुमारास अनेक ठिकाणी शुकशुकाट दिसून आला.
गेल्या काही दिवसांत झालेल्या हलक्या पावसानंतर वातावरणात उकाडा वाढला असून त्यातच ढगाळ वातावरण नाहीसे झाल्याने तापमान झपाट्याने वाढले आहे. हवामान खात्याने यापूर्वी पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी सध्या मात्र उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
कराडसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही तापमान उच्चांक गाठताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये पारा ४० अंशांवर, सोलापूरमध्ये ४३.९ अंशांवर, तर सांगलीत सुमारे ३९ अंशांपर्यंत तापमान नोंदवले गेले. त्यामुळे संपूर्ण परिसरात उन्हाचा तडाखा अधिकच जाणवू लागला आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने ‘हीटवेव्ह’चा इशारा दिला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे व आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेमुळे बाजारपेठांमध्येही ग्राहकांची संख्या घटली असून मंडई परिसरात शांतता पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

उष्माघाताचे बळी वाढण्याची भीती...

राज्यातील काही भागांत उष्माघातामुळे मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका २५ वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून यापूर्वी एका लहान मुलीचाही बळी गेला होता. त्यामुळे वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
एकूणच, कराडसह राज्यभर उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून येणारे काही दिवस नागरिकांसाठी अधिकच कष्टदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #KaradCity  #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या