🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

महारुगडेवाडीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी ; १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या विहीरीचे आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

महारुगडेवाडी (ता. कराड) येथील जनतेची तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी, या गावात विहीर खुदाईसाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. अवघ्या एका महिन्यात उभारण्यात आलेल्या या विहीरीचे लोकार्पण आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आ.डॉ. भोसले म्हणाले, की महारुगडेवाडीने माझ्याकडे विहीरीची मागणी केली होती. या विहीरीच्या कामासाठी मी तात्काळ निधी मंजूर करून दिला व आज या विहीरीचे लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. गावकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी माझा हातभार लागला, याचा मला आनंद आहे. भविष्यात गावाला २४ बाय ७ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

तसेच या विहीरी शेजारील साकव पूल जुना झालेला आहे. याठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी प्रस्ताव द्यावा. मी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. तसेच विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटचा देखील प्रस्ताव द्यावा.

 



यावेळी उपस्थित य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कुस्ती संघटक तानाजी चौरे, भाजपा अल्पसंख्यांक सातारा जिल्हाध्यक्ष वसीम मुल्ला, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष भाजपा पंकज पाटील, सवादे गावचे सरपंच संजय शेवाळे, निळकंठ शेडगे, मंडल अध्यक्ष प्रविण साळुंखे, सचिन बागट, जिंतीचे सरपंच जयवंत शेवाळे, मनवचे उपसरपंच दादा शेवाळे, महारुगडेवाडीचे सरपंच बाळकृष्ण माने, उपसरपंच अजित महारुगडे, टाळगाव सेवा सोसायटी संचालक सागर जाधव, येळगाव विविध विकास सेवा सोसायटी चेअरमन बाजीराव शेटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कराडदक्षिण #महारुगडेवाडी #अतुलबाबाभोसले #कराड


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या