🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मोहरम निमित्त कराडात ताबूत-पंजे भेटीचा पारंपरिक सोहळा; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

 


हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

कराड शहरात मोहरम निमित्त शुक्रवारी सकाळी ख्वाजा खिजर दर्गा आणि टाऊन हॉल परिसरात विविध भागांत प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या ताबूत व पंज्यांच्या पारंपरिक भेटी उत्साहात पार पडल्या. या सोहळ्यासाठी मुस्लिम बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.


सकाळपासून शहर आणि परिसरातील विविध भागांतून ताबूत व पंज्यांच्या मिरवणुका वाद्यांच्या गजरात ख्वाजा खिजर दर्गा परिसराकडे दाखल होत होत्या. शहरातील मनोरे मशीद येथे प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या आकर्षक मोरपंखी ताबूताची मिरवणूक चावडी चौक, मेन रोड, यशवंत हायस्कूल, मुख्य टपाल कार्यालय मार्गे टाऊन हॉलपर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले.


ख्वाजा खिजर दर्गा परिसरात सर्व ताबूत आणि पंजे एकत्र आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्गा आणि टाऊन हॉल परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. दर्शनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व ताबूत पुन्हा आपापल्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने नेण्यात आले.
मोहरम निमित्त दिवसभर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

(photo and video credit - star photo Karad) ✅ खालील बटनवर क्लिक करून कराडच्या मोहरमचा इतिहास आणि शॉर्ट व्हिडिओ पाहू शकता.....👇🏻


#Karad #Moharram #Muharram2026 #KaradNews #Changbhala #MaharashtraNews #Tabut #Panje #Satara #InstagramReels #YouTubeShorts #Changbhalanews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या