🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

निष्ठेच्या राजकारणाचा आदर्श ; कै. आनंदराव व प्रेमलाताई चव्हाण

 


हाराष्ट्रातील तत्वनिष्ठ आणि राजकारणातील अविस्मरणीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री कै. आनंदराव चव्हाण व माजी प्रांताध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी खासदार कै. श्रीमती प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

या कुटूंबाशी माझा गेल्या 50 वर्षांतील अनुभव, जवळून पाहिलेली निष्ठा, त्याग आणि निर्भिडपणाचा संगम.

कै. आनंदराव चव्हाण हे उच्चशिक्षित एम. ए. एल. एल. एम. होते. त्या काळात ते शेकाप पक्षाचे नेते होते. मध्यप्रदेश मधील इंदौरचे होळकर स्टेटचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते व त्या राज्याच्या घटनेचे शिल्पकार होते. 1952 च्या निवडणूकीपासून सातारा जिल्हयातील प्रभावी नेते होते. 1962 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी कै. आदरणीय आनंदराव चव्हाण व आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ यांना आवाहन केले की आता महाराष्ट्र राज्याची आपणा सर्वांना सक्षम राज्य म्हणून निर्मिती करावयाची आहे असे आवाहन करुन त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रीमंडळात त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून केमिकल फर्टीलायझर, पेट्रोलियम तसेच कायदे व उद्योग राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. एवढी मोठी पदे असताना स्वत:च्या कुटूंबासाठी कसलाही स्वार्थ केला नाही. दूर्देवाने पंडित जवाहरलाल नेहरुंचे निधन झाले. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात देखील आनंदराव चव्हाण हे मंत्री म्हणूनच कार्यरत होते.

भारताच्या लोकप्रिय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री म्हणून काम करत होते. इंदिराजींच्या क्रांतीकारी निर्णयांना त्यांनी खंबीर साथ दिली. श्रीमती इंदिराजींनी बँकाचे राष्ट्रीयकरण, राजा महाराजांचे तनखे रद्द करण्याचे विधेयक आणले तेंव्हा चव्हाण यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. 1969 च्या राष्ट्रपती निवडणूकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मा. निलमसंजीव रेड्डी यांच्या विरोधात श्री. व्ही. व्ही. गिरी यांना उमेदवार म्हणून उभे केले. त्यावेळी महाराष्ट्रातून मोजक्या खासदार, आमदार यांनी पाठिंबा दिला. त्यात कै. आनंदराव चव्हाण यांनी पाठिंबा दिला होता आणि राष्ट्रपती म्हणून ते निवडून आले, हा इंदिराजींच्या वरील सर्वात मोठा निष्ठेचा पूरावा होता.

काकी - इंदिराजींच्या विश्वासातील सावली...

1973 साली स्व. आनंदराव चव्हाण यांच्या निधनानंतर श्रीमती इंदिराजी गांधी यांनी स्वत: पुढाकार घेऊन श्रीमती प्रेमलाताई चव्हाण यांना कराड लोकसभा मतदार संघातून पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी जाहिर केली. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रयत्नाने त्या बिनविरोध खासदार म्हणून निवडून आल्या आणि सक्रीय राजकारणात सहभाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना प्रेमाने “काकी” म्हणू लागला.

1977 अग्निपरिक्षा - साताऱ्यात इंदिरा काँग्रेसची स्थापना...

आणीबाणीनंतर 1977 साली काँग्रेसचा देशात दारुण पराभव झाला. त्यावेळी महाराष्ट्रातून काँग्रेसचे फक्त पाचच खासदार निवडून आले. नंतर 1978 साली काँग्रेस पक्ष फूटला. त्यावेळी मा. वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांनी काकींना विनंती केली की तुम्ही इंदिरा काँग्रेसमध्ये जाऊ नका पण काकींनी निष्ठेने इंदिराजींना साथ दिली. सातारा जिल्हयात प्रथम काँग्रेस आय पक्षाची स्थापना केली. आदरणीय श्रीमती इंदिरा गांधी यांना काकींनी साथ केली.

1978 साली विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्यात इंदिरा काँग्रेस पक्षाच्या जास्त जागा आल्या. आणि रेड्डी काँग्रेसच्या कमी जागा आल्या. त्यावेळी आदरणीय श्रीमती इंदिरा गांधीनी मा. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यात इंदिरा काँग्रेसचे नेते मा. नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. दूर्देवाने सरकार पडले.

1980 च्या लोकसभेच्या निवडणूकीतील काँग्रेस पक्षाचा ऐतिहासिक विजय...

1980 च्या लोकसभा निवडणूकीत इंदिराजींनी काकींना लोकसभा उमेदवारीचा आग्रह केला पण वसंतदादांच्या विनंतीमूळे मा. यशवंतराव मोहिते भाऊ यांना काँग्रेस पक्षाची लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यावेळी मा. प्रेमलाताई चव्हाण काकी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पदी नियुक्ती केली गेली आणि काकी व वसंतदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा निवडून आल्या. नंतर काकी राज्यसभेच्या खासदार झाल्या. त्यावेळी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेले मा. शरदरावजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार बरखास्त झाले आणि पुन्हा महाराष्ट्रात प्रेमलाताई चव्हाण व वसंतदादा आणि बॅरिस्टर अंतूले साहेब, रामराव अधिक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका झाल्या. त्यात इंदिरा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. आणि त्यात इंदिराजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात बॅरिस्टर अंतूले यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. त्याचकाळात एका जाहिर सभेत बोलण्याच्या ओघात बॅरिस्टर अंतूले यांनी 'यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे कलंक आहेत' असे विधान केल्यानंतर श्रीमती प्रेमलाताई चव्हाण काकींनी जाहिरपणे ठणकावले की 'यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे कलंक नसून महाराष्ट्राचे भूषण आहेत.' त्या वादानंतर श्रीमती काकी यांना अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले.

इंदिराजी नंतर राजीवजींच्या विश्वासू...

1984 साली इंदिराजींच्या हत्येनंतर लोकसभा निवडणूका झाल्या त्यात पून्हा काकी लोकसभेवर निवडून आल्या.

निष्कलंक राजकारणाचा वारसा – तीन पिढया एकही डाग नाही.

काकी यांच्या कूटूंबाकडे एकही साखर कारखाना, सुतगिरणी किंवा कोणतीही संस्था नसताना यशस्वी राजकारण करण्यात यशस्वी झाल्या. त्यांच्या हयातीतच त्यांचा मुलगा मा. पृथ्वीराज चव्हाण यांना कराड लोकसभा मतदार संघातून मा. राजीव गांधी यांनी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. आणि ते निवडून आले. याच काकींच्या एकनिष्ठतेमूळे त्यांचे पूत्र उच्चशिक्षित, सुसंस्कृत श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना मा. सोनिया गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक व सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी यांचा स्वतंत्र कार्यभार दिला. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा. पृथ्वीराज चव्हाण यांना संधी दिली. महाराष्ट्रात एखादेच कूटूंब असे असेल कि आई-वडील आणि मुलगा एवढया वर्षे सत्तेत असूनही डाग लागला नाही.

अष्टपैलू व्यक्तिमत्व - काकी...

काकी या ऑल इंडिया महिला क्रिकेटच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली हेलिसिंकी, फिनलॅन्ड येथे महिला क्रिकेट संघाचा सामना झाला. त्यांचे मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभूत्व होते. त्यांचे माहेर शिरोळच्या नामांकित जगदाळे घराण्यातील होते.

आजचे राजकारण पाहिले तर पदासाठी पैशासाठी रातोरात पक्ष बदलणारे नेते बघितले तर चव्हाण घराण्याची निष्ठा एक आदर्श वाटते. सत्ता आली आणि गेली, पक्ष फूटले, पराभव झाले, पण चव्हाण घराण्याने इंदिराजींची कधीही साथ सोडली नाही.

आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरु ते राहूल गांधी, 70 वर्षे एकच निष्ठा, एकच पक्ष अशा आदर्श, निष्कलंक, एकनिष्ठ राजकारणी माननीय आनंदराव चव्हाण काका आणि माननीय श्रीमती प्रेमलाताई चव्हाण काकी यांच्या त्यागाला, निष्ठेला, निर्भिडपणाला आणि सुसंस्कृत राजकारणाला मानाचा मुजरा. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.


- अजितराव पाटील आप्पा (चिखलीकर)


➖➖➖➖➖➖➖➖➖




आनंदराव चव्हाण, प्रेमलाताई चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण
चव्हाण घराणे, काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र काँग्रेस, कराड लोकसभा, सातारा राजकारण, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्रातील काँग्रेस इतिहास, निष्कलंक राजकारण, निष्ठावंत नेतृत्व, त्याग आणि निष्ठा, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

#आनंदरावचव्हाण #प्रेमलाताईचव्हाण #पृथ्वीराजचव्हाण #चव्हाणघराणे #काँग्रेस #महाराष्ट्रकाँग्रेस #कराड #सातारा #इंदिरागांधी #यशवंतरावचव्हाण #राजीवगांधी #सोनियागांधी #निष्कलंकराजकारण #राजकीयइतिहास #महाराष्ट्रराजकारण #Congress #PrithvirajChavan #AnandraoChavan #PremalataChavan #Satara

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या